Share

लामगव्हाण घरफोडीत ४ संशयित पोलिसांच्या जाळ्यात; एकाकडे सापडलं ‘बनावट आधार कार्ड’; मोठा कट उघडकीस येणार?

लामगव्हाण येथील बंद घरातून १.७४ लाखांची चोरी झाल्यानंतर बिडकीन पोलिसांनी ४ संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे.

Published On: 

Bidkin police busting house theft gang and recovering fake ID card in Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील लामगव्हाण गावात घरफोडीचा संतापजनक प्रकार घडलाय. फिर्यादी तरुण आपल्या कुटुंबासह वडिलांच्या उपचारासाठी शहरात असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून तब्बल १ लाख ७४ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी तरुण लोहगाव येथे मेडिकल स्टोअर चालवतो. त्याचे वडील पेशाने वकील आहेत. १९ जुलै रोजी वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने, त्यांच्या उपचारांच्या सोयीसाठी संपूर्ण कुटुंबाने शहरातच एका कॉलनीत फ्लॅट भाड्याने घेतला होता. लामगव्हाण येथील मूळ घराचं बांधकाम सुरू असल्याने हा तरुण नेहमी तिथे ये-जा करायचा. १५ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजता त्याने नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावले आणि तो शहरात गेला. पण दुसऱ्या दिवशी १६ तारखेला सकाळी ८ वाजता परतल्यावर त्याला घराचा दक्षिणेकडील दरवाजा चक्क तुटलेला आढळला.

बंद घर फोडले, पोलिसांच्या जाळ्यात ४ संशयित आणि बनावट ओळखपत्र!

आत जाऊन पाहिले असता, चोरट्यांनी भिंतीतील लाकडी कपाटाचे (फडताळ) कुलूप तोडून ५ ग्रॅम, ३ ग्रॅम आणि १ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, चांदीचे २० शिक्के आणि ३० हजार रुपये रोख असा एकूण १,७४,६०० रुपयांचा मुद्देमाल पळवला. याप्रकरणी १६ ऑगस्टला रात्री उशिरा बिडकीन पोलीस ठाण्यात बीएनएस (BNS, 2023) च्या कलम ३०५(a) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याची रीतसर नोंद होताच, सूत्रे वेगाने हलली!, डीवायएसपी (DYSP) सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल योगेश नाडे यांनी तपास चक्र फिरवत ४ संशयित आरोपींना ताब्यात घेतलं. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींची आधीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.

Bidkin Theft- बनावट आधार कार्ड म्हणजे देशाच्या सुरक्षेला थेट धोका?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातली सर्वात गंभीर बाब म्हणजे ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन मुलाकडे ‘बनावट आधार कार्ड’ सापडलं आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. चोरीच्या गुन्ह्यात संशयितांकडे थेट बनावट राष्ट्रीय ओळखपत्र (Fake Aadhaar Card) मिळणं, ही अत्यंत धोक्याची घंटा आहे. फक्त स्वतःची ओळख लपवण्यासाठी हे कार्ड बनवलं गेलं होतं, की यामागे ओळखपत्रे बनवणारं एखादं मोठं रॅकेट (National Threat) सक्रिय आहे? हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. बनावट आधार कार्डचा वापर करून गुन्हेगारी लपवणं हे देशाच्या सुरक्षेसाठीही घातक ठरू शकतं. त्यामुळेच… या प्रकरणाची पाळेमुळे कुठपर्यंत रुजली आहेत, याचा शोध घेणं पोलिसांसाठी आता सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे.

“पोलीस उपनिरीक्षक मनजीतसिंग सेना या प्रकरणाचा आणि विशेषतः त्या ‘बनावट आधार कार्ड’ मागच्या मास्टरमाईंडचा कसून तपास करत आहेत. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची पोलिसांना खात्री आहे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातून लवकरच मोठे गौप्यस्फोट होण्याची दाट शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही