Share

‘आपण विरोधातच आहोत, जोमाने काम करा’; शरद पवारांचा कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश

शरद पवार यांनी आपण विरोधातच असल्याचे स्पष्ट करत कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचा संदेश दिला.

Published On: 

Sharad Pawar NCP meeting

मुंबई : गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाने एनडीए (NDA) मध्ये सामील व्हावे, अशी चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वीच या गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली होती. त्यानंतर, खासदार सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी अमित शहा यांची भेट घेतली.

सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली खासदारांच्या एका गटाने पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्यानंतर या खासदारांची शरद पवार यांच्याशीही चर्चा झाली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, हा गट एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता शरद पवार यांनी या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

Sharad Pawar NCP meeting

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बैठकीत शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला की, आपण विरोधी पक्षातच आहोत आणि जोमाने काम केले पाहिजे. विरोधी पक्षातील आपल्या भूमिकेबाबत कोणताही संभ्रम नसावा, यावर त्यांनी भर दिला आणि सर्वांना उत्साहाने काम करण्याचे आवाहन केले. शरद पवार यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीतील संभ्रम दूर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनीही या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण विधान केले. पक्षाच्या दोन दिवसीय बैठकीदरम्यान त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. राज्यातील विविध भागांतील जिल्हाध्यक्षांनी पक्ष एनडीएमध्ये सामील होणार का? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना सुळे यांनी अलीकडील संसदीय अधिवेशनात सरकारविरोधात केलेल्या भाषणांकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

ज्याप्रमाणे आपण विधिमंडळात सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देत आहोत, त्याचप्रमाणे रस्त्यावर उतरूनही लढा दिला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. सुळे यांनी जिल्हाध्यक्षांना रिक्त पदे त्वरित भरून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. तसेच आपण लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे सांगत, जनतेच्या प्रश्नांसाठी जोरदार लढा देण्याचे आवाहन केले.

शनिवार आणि रविवारी झालेल्या बैठकांमध्ये सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागांतील जिल्ह्यांचा आढावा घेतला. आता केवळ कोकण विभागातील जिल्ह्यांचा आढावा घेणे बाकी आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही