Share

संदीपान भुमरेंचे अमित शाहांना साकडे; छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करा

छत्रपती संभाजीनगरहून थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी संदीपान भुमरे यांनी अमित शाह यांची भेट घेऊन ICP मंजुरीची मागणी केली आहे.

Published On: 

Sandipan Bhumre seeks international flights for Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sanbhajinagar) आंतरराष्ट्रीय विमानसेवा (International Flight) सुरू करण्याची मागणी होत आहे. छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखली जाते. परंतु ही सेवा उपलब्ध नसल्याने संभाजीनगरसह मराठवाड्यातील पर्यटन व्यवसाय, उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसत आहे.

या संदर्भात शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी साकडे घातले. त्यामुळे त्यांच्या मागणीला यश मिळते का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

मराठवाड्याच्या औद्योगिक, पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी चालना देण्यासाठी, छत्रपती संभाजीनगर विमानतळाला त्वरित ‘इमिग्रेशन चेकपोस्ट’ (ICP) म्हणून घोषित करून तेथे आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्यास मंजुरी द्यावी, अशी विनंती संदीपान भुमरे यांनी अमित शहा यांना केली. याबाबत भुमरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन पत्र दिले आहे.

Sandipan Bhumre demand international flights for Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचे प्रमुख आर्थिक, औद्योगिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र असून, अजंठा-वेरूळ लेणी, देवगिरी किल्ला, बीबी का मकबरा यांसारख्या ऐतिहासिक आणि जागतिक पर्यटनस्थळांमुळे देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात.

मात्र, थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध नसल्यामुळे परदेशी पर्यटक, उद्योजक, गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना मुंबई किंवा दिल्लीमार्गे प्रवास करावा लागतो. छत्रपती संभाजीनगर परिसरात ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल्स, खाद्यप्रक्रिया यांसह विविध औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार होत आहे. यातून विदेशी गुंतवणुकीलाही मोठी संधी निर्माण झाली आहे.

खासदार भुमरे यांनी पत्रात नमूद केले आहे की, अशा परिस्थितीत थेट आंतरराष्ट्रीय विमान सेवा उपलब्ध झाल्यास उद्योग, व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळू शकेल.

तसेच, छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान सेवांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा सज्ज आहेत आणि ‘ब्युरो ऑफ इमिग्रेशन’ने या सुविधेची पाहणी पूर्ण केली आहे, ही बाबही त्यांनी शहा यांच्या निदर्शनास आणून दिली.

आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करू इच्छिणाऱ्या विमान कंपन्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ‘इमिग्रेशन चेकपोस्ट’ची (ICP) अधिकृत मंजुरी मिळवणे ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे आणि ही मंजुरी मिळण्यास होणारा विलंब अशा सेवांच्या सुरुवातीमध्ये अडथळा ठरत आहे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

मराठवाड्यातील उद्योगांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोडण्यासाठी आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क अत्यंत महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवांमुळे परदेशी गुंतवणूकदार, उद्योजक, तज्ज्ञ आणि व्यावसायिक यांना छत्रपती संभाजीनगरला भेट देणे अधिक सुलभ होईल.

यामुळे नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यास आणि स्थानिक उद्योगांचा विस्तार वाढवण्यास मदत होईल. आंतरराष्ट्रीय विमान सेवांच्या सुरूवात होण्यामुळे पर्यटन, उद्योग, व्यापार, गुंतवणूक, रोजगार आणि मराठवाड्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला एक मोठी नवी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही