दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आज संसदेत भाषण करणार आहेत. जंतर-मंतर (Jantar-Mantar) येथील गोळीबाराच्या प्रकरणावर ते आपली भूमिका मांडतील आणि आपल्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावतील. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत प्रश्न उपस्थित केले आहे.
“आम्हाला शाह यांचं भाषण ऐकण्यात काहीच स्वारस्य नाही. मी आणि मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी काल पत्रकार परिषद (Press Conference) घेतली. आम्हाला अमित शाह यांचे इमेजिनेशन ऐकण्यात स्वारस्य नाही. त्यांचं लेक्चर ऐकायचं नाही. ते फक्त लेक्चर देतात.” असा टोमणा राहुल गांधी यांनी मारला.
Rahul Gandhi attacks Amit Shah before Parliament speech
“विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने कुणी गोळ्या घातल्या? कुणी आदेश दिले? कुणी लाठीचार्जच्या ऑर्डर दिल्या? दिल्ली पोलीस आणि गृहमंत्रालयाने या सूचना दिल्या आहेत का?” असा सवालही राहुल गांधी यांनी केले.
अमित शाह यांनी लाठीचार्जचे आदेश कुणाचे होते हे आधी सांगावे. आदेश त्यांनी दिले असतील किंवा नसतीलही तरी अमित शाह यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांनी संसदेच्या आवारात मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे.
राहुल गांधी बोलत असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना मध्येच थांबवून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. यावर त्यांनी प्रसारमाध्यमांवर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली.
“तुम्ही मला प्रश्न विचारता. ते बोलत असताना तुम्ही त्यांना मध्येच थांबवता का? तुम्ही त्यांना प्रश्न का विचारत नाही? तुम्ही आम्हाला चोवीस तास मध्येच थांबवता. त्यांच्यात असं काय आहे की संपूर्ण मीडिया त्यांच्यासमोर उंदरासारखा उभा राहतो? हा मुद्दा मांडतानाच, विद्यार्थी त्यांना घाबरत नाहीत असे सांगून . तुम्हीही घाबरू नये, असे राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांना म्हणाले.
“अमित शाह येऊन काय बोलणार हा प्रश्न नाही? त्याची आम्हाला पर्वा नाही. २० दिवसांपासून ते गायब होते. संसदेत येत-जात होते. त्यांचा ताफा असायचा. पण ते बोलत नव्हते. फुग्यातून हवा निघून गेली आहे. शेवटच्या क्षणी ते गॅस भरण्याचा प्रयत्न करत आहेत. अमित शाह यांच्यात धाडस नाही,” असा हल्लाही त्यांनी चढवला.
📌 महत्वाच्या बातम्या
- Ghatkopar Landslide दुर्घटनेत लहान मुलांसह ६ जणांचा मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
- “३ वाजेपासून चर्चा करा, मी उपस्थित राहीन”; विरोधकांच्या गदारोळावर अमित शाहांचा पलटवार
- ‘गटर जनरेशन’ वक्तव्यामुळे कंगना रणौत अडचणीत; MP-MLA कोर्टात तक्रार, 21 ऑगस्टला सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












