मुंबई : मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar landslide) येथील गौसिया चाळ (Gausiya Chawl) परिसरात रात्री झालेल्या पावसानंतर डोंगराचा काही भाग कोसळला. प्राथमिक माहितीनुसार, या दरड कोसळल्यामुळे दोन ते तीन घरांचे नुकसान झाले आहे. तर पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. रात्रभर पडलेल्या सततच्या पावसामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफ (NDRF) च्या पथकांनी घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, डोंगराचा एक भाग अचानक खचला आणि माती व दगड दोन-तीन घरांवर कोसळले. अनेकजण घरातच अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अधिकृत आकडेवारी अद्याप उपलब्ध नसली तरी, प्राथमिक अंदाजानुसार पाच ते सहा जण अडकले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची ओळख यादव विकी, वाजिद अली, आरिफ शेख, मन्नत, अबान शेख आणि सद्दाम शेख अशी पटली आहे.
Ghatkopar landslide rescue in Mumbai after heavy rain
अग्निशमन दल आणि एनडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे. परिसरात मोठी गर्दी झाली असून प्रशासनाने घटनास्थळ सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.
नेमके काय घडले?
घाटकोपर आणि साकीनाका दरम्यान असलेल्या अशोक नगर भागात मोठी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोंगराचा काही भाग गौसिया चाळीवर कोसळला. प्राथमिक माहितीनुसार, पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
ही घटना पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान घडल्याचे रहिवाशांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि घाटकोपर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित यंत्रणांकडून सध्या बचावकार्य सुरू आहे.
घटनेबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त (DCP) गणेश शिंदे म्हणाले, “पावसामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोकनगर भागात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे.”
“पोलीस कर्मचारी तसेच बीएमसी (BMC), एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांचे अधिकारी अशा सर्व आवश्यक पथकांना बचावकार्यासाठी तैनात करण्यात आले आहे. ही घटना पहाटे ३ च्या सुमारास घडली. ४ ते ५ जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे.”
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘तिरंग्याचे प्रेम आता जागे झाले!’ हर्षवर्धन सपकाळांचा BJP-RSS वर जोरदार हल्लाबोल
- ‘हर घर तिरंगा’साठी PM मोदींचा नवा व्हिडीओ; देशवासीयांना केलं मोठं आवाहन
- ‘पक्षघटना संवैधानिक की असंवैधानिक हे कोण ठरवणार?’ संजय राऊतांचा थेट सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












