Share

मराठमोळ्या तेजस पाटीलची सातासमुद्रापार मोठी झेप! नायजेरियात जिंकले राष्ट्रकुल रौप्यपदक

नायजेरियातील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत मराठमोळ्या तेजस पाटील याने रौप्यपदक जिंकले आहे. याआधी त्याने चीनमधील स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

Published On: 

Fencer Tejas Patil posing with his silver medal at the Commonwealth U-23 Championship in Nigeria

छत्रपती संभाजीनगर – मराठमोळ्या तरुणाने थेट सातासमुद्रापार भारताचा झेंडा रोवलाय, हे तुम्हाला माहितीये का? नायजेरियातील लागोस येथे सध्या २३ वर्षांखालील राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा (Commonwealth Fencing Championship) सुरू आहे. या स्पर्धेत तेजस पाटीलने ‘मेन्स फॉईल’ प्रकारात थेट रौप्यपदकाला गवसणी घातली आहे.

अंतिम फेरीत त्याची झुंज इंग्लंडच्या ऑलिव्हर स्ट्राँगशी झाली. ही लढत १५-१३ अशी अत्यंत अटीतटीची झाली आणि त्याने रौप्यपदक निश्चित केले. तेजसचे वडील मनोज पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन पोलीस ठाण्यात फौजदार (PSI) म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मुलाच्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे सध्या पोलीस दलासह संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानाचे वातावरण आहे.

Tejas Patil Fencing: चीनमधील स्पर्धेचा अनुभव 

तेजस सध्या पुण्याच्या लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी (MIT-ADT) विद्यापीठात ‘स्कूल ऑफ कॉम्प्युटिंग’चा विद्यार्थी आहे. त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय सामन्यांचा तगडा अनुभव आहे. याच वर्षी १५ ते १७ मे २०२६ दरम्यान चीनमधील शांघाय येथे ‘फॉईल ग्रँड प्रिक्स’ ही प्रतिष्ठित स्पर्धा पार पडली. जगभरातील अव्वल फेन्सर्स सहभागी असलेल्या या स्पर्धेत तेजसने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

सततची उत्कृष्ट कामगिरी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर त्याने भारतीय संघात आपले स्थान पक्के केले होते. याशिवाय आशियाई सिनियर फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्येही त्याने आपली चुणूक दाखवली आहे. तिथे आठवे स्थान पटकावून भारतीय संघाला २०२६ च्या आशियाई खेळांसाठी पात्र ठरवण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. याच आंतरराष्ट्रीय अनुभवाच्या जोरावर त्याने आता राष्ट्रकुल स्पर्धेत पदकावर आपले नाव कोरले आहे.

एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस. यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी त्याचे खास अभिनंदन केले आहे. दुसरीकडे, ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेसाठी यश वाघ, निखिल वाघ आणि अभय शिंदे यांचीही भारतीय संघात निवड झाली होती.

अतिशय गौरवाची बाब म्हणजे, याच स्पर्धेत निखिल वाघने ‘मेन्स सेबर’ प्रकारात सुवर्णपदक जिंकून देशाची मान उंचावली आहे. राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे यांनी या खेळाडूंच्या कामगिरीवर प्रचंड आनंद व्यक्त केला आहे. या मराठमोळ्या तरुणांनी जागतिक स्तरावर आपल्या गुणवत्तेचा मोठा डंका वाजवला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही