Share

‘काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून पदवी का घ्यायची?’; विद्यार्थ्यांचा सरन्यायाधीशांना कडाडून विरोध

NALSAR विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सरन्यायाधीश सूर्यकांत यांना बोलावल्याने विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे.

Published On: 

NALSAR students protest against CJ Surya Kant invitation at convocation

ज्या व्यक्तीने देशातील तरुणांना ‘झुरळ’ म्हटलं, त्यांच्याच हातून आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची पदवी स्वीकारायची का? हा प्रश्न सध्या हैदराबादमध्ये विचारला जातोय.

हैदराबादच्या प्रसिद्ध नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च (NALSAR) विद्यापीठात मोठा वाद उभा राहिलाय. निमित्त आहे दीक्षांत समारंभाचे. या समारंभासाठी सरन्यायाधीश सूर्यकांत यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलंय. पण, २०२६ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी याला कडाडून विरोध केलाय. कुलगुरू आणि प्रशासनाला थेट पत्र लिहून त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय.

“तरुणांना कॉकरोच म्हणण्यापासून ते पोलिसांच्या क्रूरतेचे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही, अशी असंवेदनशील विधाने करणाऱ्या सरन्यायाधीशांनी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांप्रति कायम उदासीनता दाखवली आहे.” असं विद्यार्थ्यांनी या पत्रात स्पष्ट म्हटलंय.

त्यामुळेच अशा व्यक्तीच्या हातून पदवी स्वीकारणे आम्हाला योग्य वाटत नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. प्रशासनाने या निर्णयावर पुनर्विचार करावा आणि याला केवळ एका तुकडीची मागणी न मानता सर्वांची सामायिक समस्या मानावे, अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली आहे.

हा वाद अचानक सुरू झालेला नाही. मे महिन्यात एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांची तुलना ‘झुरळां’शी (Cockroaches) केली होती. “काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, जे मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात,” असं ते म्हणाले होते. या एका वक्तव्याने मोठी ठिणगी पडली.

यानंतर अभिजित दिपके यांच्या एका उपरोधिक ट्विटने सोशल मीडियावर अक्षरशः क्रांती आणली. त्यातूनच ‘काॅकरोच पार्टी’चा जन्म झाला. या पार्टीच्या आणि विद्यार्थ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाचा दणका इतका मोठा होता की, थेट धर्मेंद प्रधान यांची विकेट पडली. आता याच पार्श्वभूमीवर NALSAR चे विद्यार्थी आक्रमक झाले असून, विद्यापीठ प्रशासन काय निर्णय घेतंय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही