Share

‘स्त्रीचा सन्मान आमच्यासाठी सर्वोपरि’; काँग्रेसची भूमिका स्पष्ट

काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी सुनेत्रा पवारांबाबतच्या ट्विटचा हेतू अपमानाचा नसून विशिष्ट राजकीय परिस्थितीच्या संदर्भात असल्याचे स्पष्ट केले.

Published On: 

Atul Londhe clarifies Congress tweet controversy

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्विटचा उद्देश त्यांचा अपमान करणे किंवा त्यांना कमी लेखणे हा कधीच नव्हता. काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी स्पष्ट केले की, त्या ट्विटमध्ये राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधींच्या संदर्भात वापरलेल्या एका शब्दाचा उल्लेख होता. हा उल्लेख एखाद्या व्यक्तीला वैयक्तिकरित्या लक्ष्य करण्यासाठी नसून एका विशिष्ट राजकीय परिस्थितीच्या संदर्भात होता. काही लोक स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी या मुद्द्याचा वापर करून परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना लोंढे यांनी जोर देऊन सांगितले की, “काँग्रेस पक्ष आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ महिलांचा अत्यंत आदर करतात. महिलांचा सन्मान करणे ही त्यांच्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे. बीडमधील पत्रकार परिषदेत घडलेला प्रकार ज्यामध्ये पत्रकारांना प्रश्न विचारण्यापासून रोखले गेले आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उत्तर देण्याची संधी दिली गेली नाही, हे सर्वांनी पाहिले आहे आणि त्याच संदर्भात ते ट्विट करण्यात आले होते.”

Atul Londhe clarifies Congress tweet controversy

पुढे ते म्हणाले की, “तरीही, त्यानंतर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया लक्षात घेऊन ते ट्विट डिलीट करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः आपल्या ट्विटर हँडलवरून खेद व्यक्त केला आणि स्पष्ट केले की त्या ट्विटचा चुकीचा अर्थ लावला गेला.” लोंढे यांनी ठामपणे सांगितले की, “सुरू असलेला वाद हा स्पष्टपणे राजकीय लाभ मिळवण्याचा एक डाव आहे. ते केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरू आहे. भाजपची विचारधारा ‘मनुस्मृती’वर आधारित आहे, जी महिलांना दुय्यम स्थान देते आणि स्त्रीला कुठेही सन्मान देत नाही.”

“केवळ एका ट्विटवरून वातावरण गढूळ करण्याच्या प्रयत्नांना भाजप पाठिंबा देत आहे. ही कृती महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी नाही. अजित पवार यांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार जपले आणि महिलांचा आदर व सन्मान केला, तरीही आता त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते भाजपच्या वागणुकीचे अनुकरण करत आहेत, हे अयोग्य आहे.” असे अतुल लोंढे म्हणाले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही