Share

पुण्यात शिवसेनेला मोठा धक्का; एकही नगरसेवक निवडून न आल्याची सचिन अहिरांची खंत

पुण्यात शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून न आल्याची खंत व्यक्त करत सचिन अहिरांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अधिक वेळ देणार असल्याचे सांगितले.

Published On: 

Sachin Ahir speaks in Pune about strengthening Shiv Sena

पुणे : विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना खंत व्यक्त केली. “मित्रपक्षाकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने पुण्यात शिवसेनेचा (Shivsena) एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. मी पुण्यातील पक्ष संघटना बळकट करण्यासाठी अधिक वेळ देईन. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मुख्य प्रवाहात संधी दिली जाईल. परिणामी, नजीकच्या काळात शिवसेनेची ताकद नक्कीच वाढलेली दिसेल,” असा विश्वास सचिन अहिर यांनी व्यक्त केला.

पक्ष संघटनेसाठी सतत सक्रिय राहणार

विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड झाल्यानंतर अहिर यांनी सोमवारी पहिल्यांदाच पुण्याचा दौरा केला. त्यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शहर प्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे, अजय भोसले आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुलभा उबाळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. “विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची जबाबदारी असली, तरी राजकीय मर्यादा पाळून मी पक्ष संघटनेसाठी काम करत राहीन. उपेक्षित घटकांसह समाजातील विविध स्तरांतील कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी मी प्रयत्न करेन,” असे अहिर म्हणाले.

Sachin Ahir speaks in Pune about strengthening Shiv Sena

“मी स्वतःहून कोणालाही पक्षात आणण्याचा प्रयत्न करणार नाही. मात्र, इच्छुक स्वतःहून पुढे आल्यास त्यांचे स्वागत केले जाईल. सुषमा अंधारे यांच्याबाबतची माझी भूमिका वैयक्तिक आहे. त्यांनी पक्षासाठी शेकडो सभा घेतल्या आहेत. त्या सामाजिक चळवळींशी जोडलेल्या कार्यकर्त्या असल्याने त्या पक्ष सोडणार नाहीत. त्यांना योग्य न्याय मिळावा, याची काळजी पक्षाने घेतली पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

अहिर यांची सदिच्छा भेट

सोमवारी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची त्यांच्या ‘सिल्व्हर रॉक्स’ या पुणे येथील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.

सचिन अहिर यांनी गेल्याच महिन्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडली. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात प्रवेश केला आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक बिनविरोध जिंकली. सध्या पुणे आणि मुंबई भागात शिवसेना पक्षाचा संघटनात्मक विस्तार आणि बळकटीकरण करण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही