राजकारणात कधी कोण कोणाच्या बाजूने उभं राहील, याचा काहीच नेम नाही. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यावर काँग्रेसने खोचक टीका केली, आणि आता त्यांना चक्क अंजली दमानियांनी (Anjali Damania) सडेतोड उत्तर दिलंय.
बीडमधील एका व्हायरल व्हिडिओवरून सध्या राजकारण तापलं आहे. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना थेट ‘गुंगी गुडिया’ म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत.
Anjali Damania on Congress
काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार बीड दौऱ्यावर होत्या. पत्रकार परिषदेत त्यांना बीडच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न विचारण्यात आला. पण, मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकाराला मध्येच थांबवलं. याच घटनेवरून काँग्रेसने एक्स (ट्विटर) वर व्हिडिओ शेअर करत, “सुनेत्रा पवार, अजून किती दिवस ‘गुंगी गुडिया’ बनून राहतील” अशी बोचरी टीका केली.
काँग्रेसची हीच भाषा दमानिया यांना खटकली. राष्ट्रवादीविरोधात कायम आक्रमक भूमिका घेणाऱ्या दमानिया यांनी चक्क सुनेत्रा पवारांची पाठराखण केली आहे. त्यांनी काँग्रेसला सवाल करत म्हटलंय, “गुंगी गुडिया? काय ही भाषा? एका पक्षाला ही भाषा शोभते का?”
एवढंच नाही तर, “पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? मी राष्ट्रवादी पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले हे शब्द अतिशय चुकीचे आहेत. मी याचा तीव्र शब्दात निषेध करते,” अशा शब्दांत दमानियांनी काँग्रेसचा समाचार घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेस यावर काय स्पष्टीकरण देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- महेश भट्ट यांचा धक्कादायक खुलासा; सनी लिओनीला पाहताच क्षणी चित्रपट का दिला?
- पेट्रोल-डिझेलवरील टॅक्समध्ये सरकारची मोठी वाढ, तुमच्या खिशाला झळ बसणार का?
- राष्ट्रवादी अडचणीत? सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाचा मोठा झटका!













