नोकरी न मिळण्याला आरक्षण जबाबदार आहे की आपला अभ्यास? छोट्या पडद्यावरील ‘गोपी बहू’ अर्थात देवोलीना भट्टाचार्जीने (Devoleena Bhattacharjee) यावर असा काही जावईशोध लावलाय की ऐकून तुम्हीही चक्रावून जाल.
सोशल मीडियावर सध्या लहान मुलांचा वेदाभ्यास आणि मंत्रोच्चार करतानाचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यावर एका युजरने, ‘अभ्यासाच्या वयात मुले मंत्रोच्चार करतात आणि नंतर नोकरी न लागल्यास आरक्षणाला दोष देतात’ अशी बोचरी टीका केली होती. याच व्हिडीओला रिट्विट करत देवोलीनाने थेट आरक्षणालाच (Reservation controversy) आव्हान दिलं आणि सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलं.
Devoleena Bhattacharjee on Reservation
“एकदा मंत्रोच्चार करून पाहा, मग तुम्हाला आरक्षणाची गरजच भासणार नाही. यातून ज्ञानही मिळेल आणि तुम्ही इतरांनाही त्रास देणार नाही,” असं खळबळजनक विधान देवोलीनाने एक्स (X) वर केलं आहे. तिच्या या सल्ल्यानंतर सोशल मीडियावर अक्षरशः भडका उडाला. काही मोजक्या लोकांनी तिची पाठराखण केली असली तरी, बहुतांश नेटकऱ्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं आहे.
मंदिरात पुजारी होण्याचा अधिकार सगळ्यांनाच नसतो, असा सणसणीत टोला काही युजर्सनी लगावला. तर काहींनी तिच्या विधानात कोणताही तर्क नसल्याचे म्हणत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
वाद इतका वाढला की, नेटकऱ्यांनी थेट तिच्या आंतरधर्मीय विवाहाचा संदर्भ देत तिच्यावर वैयक्तिक हल्ले चढवले. त्यामुळे सध्या इंटरनेटवर देवोलीना विरुद्ध नेटकरी असा जोरदार सामना रंगल्याचं चित्र आहे.
दुसरीकडे, देवोलीना अशी राजकीय आणि सामाजिक विषयांवर बेधडक बोलण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच देशात गाजलेल्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणातही तिने उडी घेतली होती.
केंद्रीय पातळीवर राजीनामे सत्र सुरू असतानाच पंजाब, केरळ आणि कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे द्यावेत, अशी थेट मागणी करून तिने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता या नव्या आरक्षण आणि मंत्रोच्चाराच्या वादावर ती काय स्पष्टीकरण देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अभिजीत दिपकेंचा मोदींवर हल्लाबोल: ‘तुमची त्वचा देशाच्या भविष्यापेक्षा…’, इन्स्टाग्रामवरील ‘ती’ कमेंट चर्चेत!
- आरोग्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; तब्बल २५० अवैध गर्भपात करणारा माजी सिव्हिल सर्जन रंगेहाथ अटकेत
- विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळाल तर याद राखा; पेपरफुटी माफियांना पंतप्रधान मोदींचा थेट इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












