Share

अभिजीत दिपकेंचा मोदींवर हल्लाबोल: ‘तुमची त्वचा देशाच्या भविष्यापेक्षा…’, इन्स्टाग्रामवरील ‘ती’ कमेंट चर्चेत!

पंतप्रधान मोदींच्या सेल्फी व्हिडीओवर अभिजीत दिपकेंनी “तुमची त्वचा देशाच्या भविष्यापेक्षा चमकदार आहे,” अशी खोचक टीका करत सरकारला गंभीर इशारा दिला आहे.

Published On: 

Abhijeet Dipke criticizes PM Narendra Modi on instagram video

देशात सध्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना, देशाच्या पंतप्रधानांचा एक सेल्फी व्हिडीओ समोर येतो आणि त्यावर थेट दिल्लीपर्यंत धडकणारी एक खोचक कमेंट येते… वाचून आश्चर्य वाटलं ना?

नुकतंच संसदेत पेपरफुटी विरोधी विधेयक मंजूर करण्यात आलं. या मोठ्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी गुरुवारी रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर एक सेल्फी व्हिडीओ शेअर करत पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

Abhijeet Dipke on PM Modi

याच व्हिडीओवर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे अध्यक्ष अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी केलेली कमेंट सध्या सोशल मीडियावर आगीसारखी पसरत आहे. दिपके यांनी थेट मोदींच्या चमकदार चेहऱ्याकडे लक्ष वेधत निशाणा साधला आहे. “तुमची त्वचा देशाच्या भविष्यापेक्षा जास्त चमकदार आहे,” असा सणसणीत टोला त्यांनी या व्हिडीओखाली लगावला.

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. या आंदोलनाची धग इतकी वाढली की, अखेर वाढत्या दबावामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. सुरुवातीला भाजपने याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता, पण जंतरमंतरवरील आंदोलन चिघळल्याने सरकारला नमते घ्यावे लागले.

आता हे नवीन विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले असून, याला सरकारचा मोठा विजय मानले जात आहे. दुसरीकडे, अभिजीत दिपके यांनी सरकारला पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. “विद्यार्थ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या, अन्यथा आणखी मोठे आंदोलन उभारू,” अशी थेट तंबी त्यांनी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा संघर्ष आणखी तापण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही