दिल्ली : नीट (NEET) पेपर लीक मुद्द्यावरून जंतरमंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (sonam wangchuk)nयांनी तिथे उपोषण सुरू केले आणि त्यांना देशभरातून पाठिंबा मिळाला. मात्र, प्रकृती खालावल्यामुळे सरकारने त्यांना जंतरमंतरवरून रुग्णालयात हलवले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही वांगचुक यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (dhamendra pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी करणे हा या उपोषणाचा उद्देश होता. वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांनी आंदोलनाची धुरा सांभाळली. दिपके यांनी थेट संसदेकडे कूच करण्याचा आणि आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्या टप्प्यावर परिस्थिती अधिकच चिघळली.
या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असून त्याची व्याप्ती दररोज वाढत आहे. आंदोलकांशी चर्चा सुरू करण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले. २४ तासांत चार वेळा प्रयत्न झाले. परंतु कार्यकर्त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक महत्त्वाची घोषणा केली की, नीट पेपर लीक प्रकरणाची सुनावणी फास्ट-ट्रॅक न्यायालयात केली जाईल. असे असूनही, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अभिजित दिपके ठाम राहिले.
या पार्श्वभूमीवर, सरकारच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांना यश आले. २६ दिवसांनंतर सोनम वांगचुक यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर करून वांगचुक यांना महत्त्वाचा सल्ला दिला. पंतप्रधानांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
आपल्या पोस्टमध्ये नरेंद्र मोदी यांनी सोनम वांगचुक यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार दैनंदिन दिनचर्या पाळण्याचे आणि लवकरात लवकर आपले पूर्वीचे वजन पुन्हा मिळवण्याचे आवाहन केले. सोनम-जी निरोगी राहावेत अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो; नरेंद्र मोदींची हीच पोस्ट आता व्हायरल होत आहे. त्यांनी सोनम वांगचुक यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- ’50 ग्रॅम पावडर’ व्हायरल व्हिडिओवर जयंत पाटील भडकले; म्हणाले…
- 24 तासांत सरकारचे 4 मोठे प्रस्ताव; पण एका मागणीवरून सगळं अडलं!
- NEET Protest : पोलिसांची गाडी अडवणारी तरुणी कोण? VIDEO व्हायरल…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











