देशात सध्या नीट पेपरफुटीच्या (NEET Paper Leak) मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे, पण या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात खरंच कुणी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतंय का?
राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP Agitation) नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे पडसाद आता देशाच्या कानाकोपऱ्यात उमटू लागले आहेत. रस्त्यावर उतरलेल्या या जेन-झी (Gen-Z) जनरेशनच्या लढ्याला आता सेलिब्रिटींचीही मोठी साथ मिळत असून, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी एक व्हिडीओ शेअर करत विद्यार्थ्यांना आपला भक्कम पाठिंबा दर्शवला आहे.
Anupam Kher On Student Protest
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांच्या भावनांना थेट हात घातला. “दोन दिवसांपूर्वी तुमचे फोटो पाहून मी प्रचंड अस्वस्थ झालो. स्वतःचं मत व्यक्त करण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्यावर ही वेळ येऊ नये. मीही कधीकाळी विद्यार्थी होतो, व्यवस्थेशी भांडलोय, त्यामुळे तुमचा राग आणि अपेक्षा मी समजू शकतो,” असं खेर म्हणाले.
विद्यार्थी हाच समाजाचा खरा आवाज आणि भविष्य असल्याचं सांगत खेर यांनी आंदोलकांना एक अत्यंत महत्त्वाचा इशाराही दिला. “जेव्हा बाहेरचे लोक राजकीय अजेंडा घेऊन तुमच्या आंदोलनात घुसखोरी करतात, तेव्हा त्यांच्यापासून सावध राहा. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की लोक जोडले गेल्याने ताकद वाढतेय, पण अनेकदा तेच लोक तुमची कमजोरी बनतात आणि तुमचा फायदा उचलतात,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांचे कान टोचले आहेत.
दुसरीकडे, या देशव्यापी आंदोलनाला बॉलिवूडमधून मोठा पाठिंबा मिळतोय. शबाना आझमी, प्रकाश राज, रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा आणि सोनू सूद यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियावरून विद्यार्थ्यांची बाजू घेतली आहे. तर मुंबईत गुरफतेह सिंह पीरझादा आणि प्रतिभा रांटा या तरुण कलाकारांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून मोर्चामध्ये सहभाग नोंदवला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘आपण माणसं नाही, झोंबी झालो आहोत…’; विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर समीर चौघुलेंचा संताप
- NEET आंदोलनासाठी ठाकरे बंधू एकत्र; 26 जुलैला संयुक्त मोर्चाची घोषणा, मोदी सरकारवर जोरदार टीका
- PM मोदींची पेपरफुटीवर पहिली प्रतिक्रिया; फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन करणार! दोषींना कठोर शिक्षा













