Share

सूपमध्ये झुरळ, फ्रिजमध्ये धक्कादायक प्रकार; तुकाराम मुंडेंचा नागपुरात मोठा दणका!

नागपुरातील हॉटेलमध्ये सूपमध्ये झुरळ आणि अत्यंत अस्वच्छता आढळून आल्याने तुकाराम मुंडे यांच्या एफडीए विभागाने हॉटेलचा परवाना थेट रद्द केला आहे.

Published On: 

Tukaram Mundhe FDA action against unhygienic restaurants in Nagpur

तुम्हीही नेहमी ‘आम्ही उघड्यावरचं खात नाही, मोठ्या आणि ब्रँडेड हॉटेलमध्येच जेवतो’ असं अभिमानाने सांगता का? मग जरा थांबा. कारण मोठ्या आणि नामांकित हॉटेल्सच्या किचनमध्ये नेमकं काय शिजतंय, हे ऐकून तुमच्याही पायाखालची वाळू सरकेल. अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे (Tukaram Mundhe) यांनी नागपूरमधील प्रसिद्ध हॉटेल्सवर धडक कारवाई करत अत्यंत धक्कादायक प्रकार उजेडात आणला आहे.

नागपूरच्या प्रसिद्ध ‘अशोका रेस्टॉरंट’मध्ये एका ग्राहकाच्या सूपमध्ये चक्क मेलेले झुरळ सापडल्याने मोठी खळबळ उडाली. कुणाल नरसापूरकर हे तिथे जेवायला गेले असताना हा किळसवाणा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच तुकाराम मुंडे यांच्या एफडीए विभागाने तातडीने दखल घेत या हॉटेलवर छापा टाकला आणि थेट त्यांचा परवानाच रद्द केला.

Tukaram Mundhe FDA Action

अशोका रेस्टॉरंटच्या किचनची तपासणी केली असता अधिकाऱ्यांना तिथे प्रचंड अस्वच्छता आढळून आली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हॉटेलच्या फ्रिजमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकत्र आणि अतिशय अयोग्य पद्धतीने कोंबून ठेवल्याचे समोर आले. थेट ग्राहकांच्या आरोग्याशी असा जीवघेणा खेळ सुरू असल्याचे पाहून अधिकाऱ्यांनी तात्काळ कठोर कारवाई केली.

फक्त अशोका रेस्टॉरंटच नाही, तर नागपूरच्या प्रसिद्ध ‘हिरा स्वीट्स’वरही नुकतीच अशीच कारवाई करण्यात आली. तिथे तर किचनमध्ये चक्क मेलेले उंदीर सापडले होते. तुकाराम मुंडे यांनी एफडीएची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यभर भेसळखोरांचे आणि अस्वच्छ हॉटेल्सचे धाबे दणाणले आहेत.

मुंडे यांच्या धडक कारवायांमुळे राज्यात भेसळयुक्त दुधाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर घटले आहे. तुमच्याही आजूबाजूला कुठेही असा संशयास्पद प्रकार किंवा अस्वच्छता दिसल्यास तात्काळ एफडीएकडे तक्रार करा, असे आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही