मुंबई (Cyber Crime) – फेसबुकवर एखाद्या अनोळखी सुंदर मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली की अनेकांच्या आनंदाला पारावार उरत नाही. पण हीच एक ‘रिक्वेस्ट’ तुमची आयुष्यभराची कमाई क्षणार्धात हिरावून घेऊ शकते, याचा तुम्ही कधी विचार केलाय? नालासोपाऱ्यात घडलेला हा प्रकार ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.
नालासोपारा येथे राहणाऱ्या एका ५६ वर्षीय व्यक्तीला फेसबुकवरील एका कथित ‘रशियन’ तरुणीच्या मैत्रीचा चांगलाच फटका बसलाय. केवळ गोड बोलण्याच्या जाळ्यात ओढून या भामट्यांनी संबंधित व्यक्तीकडून तब्बल ७ लाख ३८ हजार ५०० रुपये उकळले आहेत. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
Russian Girl Scam | Cyber Crime
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी तक्रारदार व्यक्तीला सोशल मीडियावर एका अज्ञात महिलेने मेसेज केला. आपण रशियन नागरिक असून नुकतंच भारतात आल्याचं तिने सुरुवातीला भासवलं. काही दिवसांच्या चॅटिंगनंतर तिने थेट दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी अडवून ठेवल्याची बतावणी सुरू केली.
आपल्याकडे काही मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे असल्याने कस्टमने कारवाई केल्याचा बनाव तिने अत्यंत हुशारीने रचला. यातून सुटण्यासाठी तातडीने पैशांची गरज असून, बाहेर येताच सर्व रक्कम प्रामाणिकपणे परत करेन, असं भावनिक आवाहन तिने केलं.
या गोड शब्दांना भुलून तक्रारदाराने तिने दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर थोडेथोडके नव्हे तर तब्बल ७ लाख ३८ हजारांची रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर केली. मात्र, पैसे खात्यात जमा होताच या ‘रशियन’ तरुणीने तिचा फोन आणि सोशल मीडिया अकाउंट्स कायमचे बंद केले.
आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी थेट पोलिसांत धाव घेतली. सध्या वालीव पोलीस आणि सायबर सेल या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी मैत्री करताना आता शंभर वेळा विचार करण्याची वेळ आलीये.
📌 महत्वाच्या बातम्या
- ४००० कोटींच्या ‘रामायण’चा ट्रेलर पाहताच रामदेव बाबांची प्रतिक्रिया; म्हणाले पडद्यावरून सुटलेला बाण….
- २४ तासांत चांदी तब्बल १८ हजारांनी स्वस्त, सोन्यातही मोठी घसरण; आज काय आहेत ताजे दर?
- ठाकरे गटाला मोठा धक्का; ६ खासदार शिंदेंकडे; सर्वोच्च न्यायालय गुलाम, संजय राऊतांचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












