Share

२० सेंटीमीटरचं रेड कार्पेट अन् मोदींची खिल्ली; ऑस्ट्रेलियन टीव्हीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान

ऑस्ट्रेलियन टीव्ही शोमध्ये पंतप्रधान मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची आणि अँथनी अल्बानीज यांच्यासोबतच्या गळाभेटीची उडवली खिल्ली.

Published On: 

Australian news anchors playfully mocking PM Narendra Modi and Australian PM Anthony Albanese's interactions.

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया– एखाद्या देशाच्या पंतप्रधानांचं दुसऱ्या देशात स्वागत होतं, तेव्हा तो क्षण अभिमानाचा असतो. पण, यजमान देशातील टीव्ही चॅनेलवर या दौऱ्याची खिल्ली उडवली जात असेल तर? सध्या असाच एक ऑस्ट्रेलियन न्यूज शोचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील काही क्षणांवर ऑस्ट्रेलियन पत्रकारांनी चांगलीच फिरकी घेतली आहे. यात अगदी विमानतळावरील छोट्या रेड कार्पेटपासून ते ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबतच्या गळाभेटीपर्यंत अनेक गोष्टींवर खोचक प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. हा व्हिडिओ आता चांगलाच चर्चेत आला आहे.

मोदींच्या ‘त्या’ रेड कार्पेट आणि ‘१+१=११’ ची जोरदार चर्चा

व्हिडिओच्या सुरुवातीलाच मोदींचं मेलबर्नमध्ये आगमन होताना दाखवलं आहे. पण इथलं रेड कार्पेट इतकं छोटं होतं की, पत्रकारांनी त्याला थेट ‘योगा मॅट’ची उपमा दिली. ‘फक्त २० सेंटीमीटरचं रेड कार्पेट?’ असा खोचक सवालही त्यांनी विचारला. शिवाय, मोदींनी घातलेल्या काळ्या रंगाच्या जॅकेटची तुलना थेट ‘मेलबर्नच्या पारंपारिक वेशभूषेशी’ करून त्यांनी हशा पिकवला.

पुढे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंधांवर बोलताना मोदींनी “१+१ म्हणजे २ नाही, तर ११ होतात” असं विधान एका बैठकीत केलं होतं. ऑस्ट्रेलियन टीव्हीवर यावरही अँकर्सनी गणिती सूत्र मांडत चांगलीच मजा घेतली. सूत्रांच्या मते, हा एक व्यंग्यात्मक (satirical) न्यूज शो आहे, त्यामुळे त्यांनी या दौऱ्याकडे पूर्णपणे विनोदी अंगाने पाहिलं आहे.

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) मोदी आणि अल्बानीज एकत्र दिसले. यावेळी दोघांनी एकमेकांना दिलेल्या अनेक मिठी (hugs) आणि हातात हात धरून चालण्यावरून अँकर्सनी त्यांना ‘शाळेतील दोन जिवलग मित्र’ म्हटलं आहे. हे दोन्ही नेते एकमेकांचे हात सोडायला तयारच नाहीत, असं म्हणत त्यांनी या दृश्यांची खिल्ली उडवली. ‘कदाचित प्रसिद्ध गायिका कायली मिनोगलाही या दोघांचा हेवा वाटेल’, अशी मिश्किल टिप्पणी करत त्यांनी या मैत्रीवर बोट ठेवलं आहे. अजून यावर कोणतीही अधिकृत राजकीय प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र सोशल मीडियावर या व्हिडिओवरून जोरदार चर्चा सुरू आहे.

नोट – बातमी ऑस्ट्रेलियन टीव्हीवरील एका व्यंग्यात्मक (satirical) न्यूज शोच्या व्हिडिओवर आधारित आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही