मुंबई: ‘ऑपरेशन टायगर’नंतर (Operation Tiger) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज पहिल्यांदाच दिल्लीला रवाना झाले आहेत. १७ जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Union Cabinet expansion) होणार आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाला एक कॅबिनेट मंत्रीपद (Cabinet Minister) आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार आहे. यात खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना कॅबिनेट मंत्री पद दिले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बाहेर पडलेल्या सहा खासदारांमध्ये या मंत्रीपदांसाठी चढाओढ सुरू आहे. शिंदे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत.
17 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार
१७ तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, खासदार श्रीकांत शिंदे यांचा केंद्रीय मंत्री म्हणून समावेश केला जाणार आहे. आज सायंकाळी ४ वाजता खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेचे इतर खासदार एका विशेष विमानाने (चार्टर्ड फ्लाईट) मुंबईहून दिल्लीला रवाना होतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्व खासदार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात आज रात्री बैठक होणार असल्याचे समजते.
6 खासदारांमध्ये कुणाची वर्णी?
ठाकरे गट यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून शिंदे यांच्या गटात सहा खासदार सामील झाले आहेत. त्यापैकी एकाची राज्यमंत्री म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. केंद्रीय राज्यमंत्रीपदासाठी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यात चुरस अपेक्षित आहे. दिल्लीतील सध्याच्या दौऱ्यादरम्यान हे मंत्रिपद कोणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उर्वरित चार खासदारांवर कोणत्या समित्यांची जबाबदारी सोपवली जाईल, याबाबतही जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्थान मिळेल की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या विस्तारात सहभागी होण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. एनडीएमध्ये (NDA) सामील झाल्यापासून, हा पक्ष ‘राज्यमंत्री’ पदाऐवजी ‘कॅबिनेट’ दर्जाच्या पदाची मागणी लावून धरलेली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘राणेंशी चांगले राहा’; निलेश राणेंचा विरोधकांना सूचक इशारा
- ‘उबाठा’ गट ‘कॉकरोच जनता पार्टी’त विलीन होणार? भाजपचा खोचक सवाल
- सुनेत्रा पवारांच्या अडचणी वाढणार! राष्ट्रीय अध्यक्षपद जाणार? फेरनिवडणुकीची मागणी
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









