सुनेत्रा पवारांच्या अडचणी वाढणार! राष्ट्रीय अध्यक्षपद जाणार? फेरनिवडणुकीची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला कायदेशीर नोटीस पाठवत फेरनिवडणुकीची मागणी केली आहे.

Published On: 

Sunetra Pawar

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून (NCP President) पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह (Sachhidanand Singh) यांनी अधिकृत कायदेशीर नोटीस (Legel Notice) पाठवून त्यांच्या कार्यकाळाला आव्हान दिले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सिंह यांनी ९ जुलै रोजी ही नोटीस बजावली असून, त्यात राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक (Election Dispute) नव्याने घेण्याची मागणी केली आहे. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेली निवडणूक अवैध असल्याचा दावा त्यांनी केला आहे; परिणामी, सुनेत्रा पवार यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सच्चिदानंद सिंह यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी फेरनिवडणुकीची मागणी केली आहे. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेली निवडणूक बेकायदेशीर होती आणि ती रद्द करण्यात यावी, असा आग्रह त्यांनी धरला आहे. ही नोटीस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे सचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना बजावण्यात आली आहे. नवीन निवडणूक घेण्यासाठी एका स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक अधिकाऱ्याची (रिटर्निंग ऑफिसर) नियुक्ती करण्याची मागणी यात करण्यात आली आहे. तसेच, या प्रक्रियेदरम्यान सध्याच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि पदाधिकाऱ्यांची यादी अवैध मानली जावी, असेही या नोटीशीत नमूद करण्यात आले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही