Share

राम मंदिरात सुरक्षा वाढली! दान मोजणीसाठी नवे नियम लागू

दान चोरी प्रकरणानंतर राम मंदिरात सुरक्षा वाढवण्यात आली असून दान मोजणीसाठी नवीन नियम आणि कडक ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.

Published On: 

Ayodya Ram Mandir

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात दान मोजणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मोठे बदल करण्यात आले आहेत. दान मोजणी कक्षात प्रवेश करण्यापूर्वी आता कर्मचाऱ्यांना कडक सुरक्षा तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दान मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ‘नो पॉकेट’ असलेला डार्क ब्लू रंगाचा ड्रेस (Dress Code) अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याची दोन टप्प्यांत सुरक्षा तपासणी केल्यानंतरच मोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार आहे. (Ram Mandir Donation News)

जमिनीवर बसून होणार दानाची मोजणी

यापूर्वी दानाची मोजणी खुर्ची-टेबलवर करण्यात येत होती. मात्र, दान चोरी प्रकरणानंतर दानाची मोजणी जमिनीवर बसून केली जाणार आहे. याशिवाय मोजणी कक्षात मोबाईल, कॅमेरा, बॅग किंवा इतर कोणतेही वैयक्तिक सामान नेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना चपला बाहेर काढूनच कक्षात प्रवेश करावा लागणार आहे. (Ram Mandir Donation Counting Rules Update)

दान चोरी प्रकरणामुळे वाढली सतर्कता

राम मंदिरातील दान चोरी प्रकरणानंतर ही नवी सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी अनुकल्प मिश्रा (Anukalpa Mishra)  याच्याबाबतही नवे तपशील समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनुकल्प मिश्रा याच्या नावावर मंदिरात ‘व्यवस्था कार्यकर्ता’ म्हणून एंट्री पास जारी केला जात होता. विशेष कार्यक्रमांदरम्यान याच पासच्या आधारे त्याला मंदिर परिसरात प्रवेश मिळत असल्याचा आरोप आहे.

याच एंट्री पासच्या आधारे अनुकल्प मिश्रा दानाच्या रकमेच्या मोजणी प्रक्रियेत सहभागी होत असल्याचाही दावा केला जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून विविध बाबींची चौकशी केली जात आहे. दरम्यान, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य महंत दिनेंद्र दास महाराज (Dinendra Das Maharaj) यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. देवाच्या घरात गुन्हा करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांची भूमिका आहे.

तपासात नवे खुलासे

राम मंदिरातील दान चोरी प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात सातत्याने नवे खुलासे समोर येत आहेत. त्यानंतर मंदिर प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही