Share

प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ नं ओलांडला 100 कोटींचा टप्पा; अभिनेता प्रसाद ओक म्हणाला…

‘देऊळ बंद 2’ ने जगभरात 100 कोटींची कमाई करत नवा विक्रम रचला आहे. या यशानंतर अभिनेता प्रसाद ओकने दिग्दर्शक प्रवीण तरडेंचे भरभरून कौतुक केले.

Published On: 

Deool Band 2 movie director Pravin Tarde and actor Prasad Oak

🕒 1 min read

फक्त १० कोटी रुपयांचे बजेट असलेला एखादा सिनेमा बॉक्स ऑफिसवर थेट १०० कोटींचा गल्ला जमवू शकतो, यावर तुमचा विश्वास बसेल का? पण हे अशक्य वाटणारं स्वप्न आता सत्यात उतरलंय.

दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांच्या ‘देऊळ बंद २’ (Deool Band 2) या चित्रपटाने हा ऐतिहासिक टप्पा पार करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. सध्या जगभरात या सिनेमाचा अक्षरशः डंका वाजत आहे. प्रदर्शनानंतर अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या सिनेमाने कमाईचे सगळे जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

Deool Band 2 Box Office

विशेष म्हणजे, नुकत्याच गाजलेल्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटानंतर १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेणारा हा दुसरा मराठी सिनेमा ठरला आहे. या घवघवीत यशानंतर आता संपूर्ण सिनेसृष्टीतून ‘देऊळ बंद २’ च्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

याच सिनेमात स्वतः एक छोटी पण अत्यंत प्रभावी भूमिका साकारणाऱ्या अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) याने नुकताच इन्स्टाग्रामवर एक लाईव्ह व्हिडिओ शेअर केला.

यात त्याने प्रवीण तरडेंचं तोंडभरून कौतुक केलं. “गेले ४० दिवस या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. आजवर प्रवीणवर माता सरस्वती आणि लक्ष्मीची कृपा होतीच, पण आता त्याच्या पाठीशी स्वतः श्री स्वामी समर्थ ठामपणे उभे आहेत. त्यामुळे पुढची ५० वर्षे तरी तो मागे वळून बघणार नाही,” असा मोठा दावा प्रसादने या व्हिडिओत केला आहे.

सिनेमाच्या शूटिंगदरम्यान संपूर्ण टीमने किती हालअपेष्टा सहन केल्या, याचा पाढाच प्रसादने यावेळी वाचला. तो म्हणाला की, मुसळधार पावसामुळे सेटवर झालेलं मोठं नुकसान आणि त्यानंतरही प्रवीणने स्वामींवर ठेवलेली गाढ श्रद्धा, या सगळ्याचा मी जवळून साक्षीदार आहे. अत्यंत प्रामाणिकपणे केलेल्या या कष्टाचं फळ आज या सिनेमाला मिळालं आहे.

दुसरीकडे, ‘धर्मवीर’पासून सलग सुपरहिट सिनेमे देणारा प्रवीण हा आपल्या पिढीतील एकमेव कसलेला दिग्दर्शक असल्याचंही प्रसादने आवर्जून नमूद केलं.

सध्या बॉक्स ऑफिसवर ‘राजा शिवाजी’ (१३० कोटी), ‘तुंबाडची मंजुळा’, आणि ‘घबाडकुंड’ यांसारख्या सिनेमांमुळे मराठी सिनेसृष्टीला खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस आल्याचे आनंददायी चित्र पाहायला मिळत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही