Share

हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं! ‘या’ प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ

SRH ची मालकीण काव्या मारन आणि गायक अनिरुद्ध रविचंदर लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. अनिरुद्धचे मामा वाय. जी. महेंद्रन यांनी याला दुजोरा दिला आहे.

Published On: 

Kavya Maran Anirudh Ravichander - Kavya Maran to marry singer Anirudh Ravichander

🕒 1 min read

आयपीएलच्या मैदानात आपल्या एका स्माईलने लाखो तरुणांना घायाळ करणारी ‘नॅशनल क्रश’ काव्या मारन (Kavya Maran) आता खरोखरच कुणाची तरी होणार आहे? होय, बरोबर वाचलंत!

१८ हजार कोटींच्या ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. आणि नवरा मुलगा कोण? तर प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अनिरुद्ध रविचंदर (Anirudh Ravichander).

Kavya Maran Wedding

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काव्या मारन आणि अनिरुद्ध हे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. गेल्या एक-दोन वर्षांपासून या दोघांच्या नात्याबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. मात्र, आता थेट अनिरुद्धच्या कुटुंबातील एका ज्येष्ठ सदस्यानेच यावर शिक्कामोर्तब केल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अनिरुद्धचे मामा आणि अभिनेते वाय. जी. महेंद्रन यांनी नुकत्याच ‘केपीटीव्ही’ला (KPTV) दिलेल्या एका मुलाखतीत हा मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, “माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार, काव्या मारनसोबत त्याचं लग्न जवळपास निश्चित झालं आहे. तो एका अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबाचा जावई होणार आहे. अनिरुद्ध हा अत्यंत समजूतदार मुलगा असून या निमित्ताने मी त्याचं अभिनंदन करतो.”

काव्याच्या व्यावसायिक कौशल्याचं कौतुक करताना महेंद्रन पुढे म्हणाले, “काव्या ही काही सामान्य मुलगी नाही. ती एकटीने आयपीएलसारखी मोठी टीम यशस्वीपणे सांभाळते. वडिलांकडून तिला व्यवसायाची उत्तम समज वारशाने मिळाली आहे. त्यांची जोडी उत्तम असून त्यांनी एकत्र येऊन संगीत व्यवसायातही नक्कीच नशीब आजमावून पाहायला हवं.”

याआधी २०२५ मध्ये एका रेडिट (Reddit) पोस्टवरूनही ते दोघे वर्षभरापासून डेट करत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावेळी अनिरुद्धच्या टीमने या निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं होतं.

पण आता स्वतः मामांनीच लग्नाचे संकेत दिल्याने, लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. अर्थात, हे लग्न कधी आणि कुठे होणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी नाही. तरीही, क्रिकेट आणि संगीताच्या या अनोख्या संगमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही