Share

Ketan Agrawal Murder Case : चेतनच्या पँटमध्ये दडलंय ‘ते’ गुपित?

केतन अग्रवाल हत्याकांडात चेतनच्या पँटच्या पुराव्यावरून नवा वाद निर्माण झाला असून, पोलिसांचा तपास आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद चर्चेत आला आहे.

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुण्यातील कोट्यधीश कुटुंबातील केतन अग्रवाल (Ketan Agrawal) यांच्या हत्येप्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Chaudhary) यांची सखोल चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात दोन्ही आरोपींनी केतनच्या हत्येचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी दोन्ही आरोपींची कोठडी वाढवून देण्याची मागणी न्यायालयात केली आहे. (Police Investigation)

मात्र, आरोपी चेतन चौधरीच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध करत वेगळाच दावा केला आहे. चेतनचा या हत्याकांड मध्ये सहभाग नाही, त्याला जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवले जात असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.

न्यायालयात चेतनच्या वकिलांचा युक्तिवाद

चेतन चौधरीची बाजू मांडताना अॅड. राम सहाणे यांनी सांगितले की, एफआयआरमध्ये चेतनचे नाव केवळ दोन वेळा नमूद करण्यात आले आहे. सिया गोयल वारंवार चेतनचे नाव घेत असल्यामुळे त्याच्यावर संशय घेतला जात आहे. चेतनचा मोबाईल, हुडी आणि गाडी यासारख्या वस्तू पोलिसांनी आधीच जप्त केल्या आहेत. मात्र, आता त्याची पँट जप्त करण्याची गरज का निर्माण झाली, असा सवाल वकिलांनी उपस्थित केला.

‘पँट हवी होती तर आधीच दिली असती’

चेतनच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, तपासासाठी आवश्यक असलेली गाडी त्यांनी स्वतः पोलिसांकडे दिली. पँटची गरज असल्याचे सांगितले असते तर ती देखील उपलब्ध करून दिली असती. मोबाईल फोन सियाकडे होता, मग त्यासाठी चेतनच्या पोलीस कोठडीचा संबंध काय? असा सवालही वकिलांनी केला. सात दिवसांच्या कोठडीत पोलिसांनी तपासासाठी आवश्यक कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पुढील कोठडीला विरोध केला.

हत्येच्या कटाचा तपास सुरू

दरम्यान, पोलिसांचा दावा आहे की, हत्येच्या कटातील प्रत्येक बाबीचा तपास करणे आवश्यक आहे. घटनास्थळावरील पुरावे, आरोपींचे हालचाली आणि वस्तूंची जप्ती याबाबत अधिक चौकशी केली जात आहे. केतन अग्रवाल हत्याकांडात चेतनच्या पँटसह इतर पुरावे किती महत्त्वाचे ठरणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही