Share

‘वेलकम टू द जंगल’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई

‘वेलकम टू द जंगल’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात करत 18.75 कोटींचे नेट कलेक्शन केले.

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बहुप्रतिक्षित मल्टिस्टारर कॉमेडी चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome To The Jungle) अखेर मोठ्या पडद्यावर दाखल झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) दमदार सुरुवात केली. 2026 मधील चर्चेतील चित्रपटांपैकी एक असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

लोकप्रिय ‘वेलकम’ फ्रँचायझीचा पुढील भाग असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचा परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्येही दिसून आला आहे. इतर हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांशी स्पर्धा असतानाही ‘वेलकम टू द जंगल’ने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. विनोदी कथा, मोठी स्टारकास्ट आणि फ्रँचायझीची (Franchise) लोकप्रियता यामुळे चित्रपटाला पहिल्या दिवसापासून चांगला प्रतिसाद मिळाला.

बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 15 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. तसेच रिलीजपूर्वी झालेल्या पेड प्रीव्ह्यूमधून 3.75 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाचे एकूण नेट कलेक्शन 18.75 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जागतिक स्तरावर चित्रपटाने सुमारे 29 कोटी रुपयांचा ग्रॉस कलेक्शन केल्याची माहिती आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीत चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ट्रेलरपासूनच होती प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतरच चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अनेक वर्षांनंतर ‘वेलकम’ फ्रँचायझीचा (Welcome Franchise) नवा भाग पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. रिलीज झाल्यानंतर अनेक ठिकाणी सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली.

या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar), दिशा पटानी (Disha Patani), रवीना टंडन (Ravina Tandan), जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez), परेश रावल (Paresh Ravel), सुनील शेट्टी (Sunil Shetty), अरशद वारसी (Asharad Warsi) यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकार झळकत आहेत. मोठी स्टारकास्ट आणि विनोदी शैलीमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली होती.

‘वेलकम’ फ्रँचायझीचा यशस्वी इतिहास

‘वेलकम’ फ्रँचायझीचा पहिला चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. अनीस बज्मी यांच्या दिग्दर्शनाखाली आलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आणि बॉक्स ऑफिसवर यश मिळवले.

यानंतर 2015 मध्ये ‘वेलकम बॅक’ प्रदर्शित झाला. या चित्रपटात अक्षय कुमार नसला तरी त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता ‘वेलकम टू द जंगल’मुळे ही लोकप्रिय फ्रँचायझी पुन्हा चर्चेत आली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही