Share

पहिल्या रांगेतील खुर्चीवरून वाद; अभिमन्यू पवारांना मेधा कुलकर्णींचं प्रत्युत्तर, म्हणाल्या ‘आत्मपरीक्षण करा’

पहिल्या रांगेतील आसन व्यवस्थेवरून झालेल्या वादानंतर मेधा कुलकर्णींनी अभिमन्यू पवारांना प्रत्युत्तर देत आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला.

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुण्यात झालेल्या एका शासकीय कार्यक्रमात पहिल्या रांगेतील खुर्चीवरून झालेल्या वादानंतर भाजपच्या दोन नेत्यांमधील नाराजीनाट्य समोर आले आहे. राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांच्यावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करत आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra fadnavis) यांच्या उपस्थितीत सारथी संस्थेच्यावतीने (Sarthi sanstha) यूपीएससी(UPSC), एमपीएससी (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पहिल्या रांगेतील खुर्चीवरूनवाद झाल्याने मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी या प्रकरणावर पत्रकारांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, “कार्यक्रमात पहिल्या रांगेत काही रिकाम्या खुर्च्या होत्या. माधुरीताई किंवा अन्य मंत्रिमहोदय कार्यक्रमात उपस्थित नव्हते. अधिकारी म्हणाले की जर या खुर्च्या रिकाम्या असतील तर मेधा कुलकर्णी यांचा प्रोटोकॉल आहे. माझ्याकडे एका कमिटीचे अध्यक्षपद असल्याने त्यांनी मला समोर बसायला सांगितले. यावर मी बोलली की, इथे नरेंद्र पाटील ही बसू शकतात कारण ते महामंडळाचे अध्यक्ष आहेत, आमदार आहेत. अभिमन्यू पवारांना तिथे बसायचे होते म्हणून धावाधाव चालली होती. हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे, तुम्ही इथे बसलात तर वाद होण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या मराठा समाजातील कर्तृत्वान मुलांचा आहे. हा कार्यक्रम शासनाचा असल्याने खुर्च्यांची व्यवस्था ही प्रोटोकॉलनुसार केली जाते, जातीनुसार नाही.” असेही त्यांनी स्पष्ट केले.

मेधा कुलकर्णी यांनी पुढे सांगितले की, समाजाच्या नावावर वाद निर्माण करण्यापेक्षा सर्वांनी विचारांच्या आधारावर एकत्र राहण्याची गरज आहे. “मी कुठेही गेले तरी हिंदू म्हणून जगण्याचा विचार करते. जातीचा विषय कुठून आला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “अभिमन्यूजींना माफ करते, पण त्यांनी आत्मपरीक्षण करावं,” असे मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही