Share

Ketan Agrawal Death Case: सियाला लग्न का करायचं नव्हतं? तपासात धक्कादायक कारण समोर

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या कथित कटाचा तपास सुरू असून, लग्नातील तणाव आणि लोहगड रेकीसंबंधी नवे खुलासे समोर आले आहेत.

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, पोलिसांच्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी सिया गोयल (Siya Goyal) हिला केतनसोबत (Ketan Agrawal) लग्न करायचे नव्हते आणि दोघांमध्ये काही कारणांमुळे दुरावा निर्माण झाला होता.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केतनच्या केसांबाबत सियाला आक्षेप होता. केतन टक्कल लपवण्यासाठी विग वापरत असल्याचे तिला पसंत नव्हते, असा पोलिसांचा दावा आहे. याच कारणातून दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली आहे.

पोलिसांच्या दाव्यानुसार, सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला संपवण्याचा कट रचला. केतनला ट्रेकिंगची आवड असल्याची माहिती दोघांना होती. याचाच फायदा घेत त्याला लोहगड किल्ल्यावर नेऊन दरीत ढकलून अपघाताचा बनाव करण्याचा कथित कट आखण्यात आला. तपासानुसार, आरोपींनी लोहगड किल्ल्यावर तीन वेळा जाऊन रेकी केली होती. कोणत्या ठिकाणी दरी खोल आहे आणि कुठून ढकलल्यास घटना अपघातासारखी दिसेल, याची पाहणी केल्याचा पोलिसांचा दावा आहे.

14 जून रोजी केतन आणि सिया लोहगडवर गेले होते. त्यावेळी केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, खाली पडताना केतनने झाडाची फांदी पकडल्याने तो बचावला. या घटनेनंतर सियाने “साप आला होता” असे सांगून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर केतनला एकटीने दरीत ढकलणे शक्य नसल्याने सियाने चेतनची मदत घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. 18 जून रोजी चेतनही लोहगडवर गेला होता. योग्य संधी साधून सियाच्या इशाऱ्यानंतर चेतनने केतनला दरीत ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

सुरुवातीला हे प्रकरण अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, मोबाईल कॉल रेकॉर्ड, आरोपींच्या हालचाली, तांत्रिक पुरावे आणि घटनास्थळावरील तपासाच्या आधारे पोलिसांनी हा कथित कट उघड केल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, सिया गोयलला अटक झाल्यानंतर तिला भेटण्यासाठी तुरुंगात कुटुंबातील कोणीही आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुसरीकडे, आरोपी चेतन चौधरीला भेटण्यासाठी त्याचे वडील तुरुंगात गेल्याचे सांगण्यात आले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही