🕒 1 min read
Modi Cabinet Expansion 2026 : मोदी सरकारच्या (Modi Govt) केंद्रीय मंत्रिमंडळात (Central Cabinet) लवकरच मोठा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. काही मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळातील (Central Cabinet) काही पदांवर बदल होऊ शकतात. कामगिरी समाधानकारक नसलेल्या काही मंत्र्यांना वगळून नव्या नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. या फेरबदलाबाबत फक्त औपचारिक घोषणा करणे बाकी असून सर्वकाही ठरल्याचीही माहिती आहे.
महाराष्ट्रातून दोन खासदारांचा केंद्रीय मंत्रिमंडळात (Central Cabinet) समावेश होऊ शकतो. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shikant Shinde) आणि खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना आणखी वेग आला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातही या घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिंदे गटाची ताकद वाढली आहे. या राजकीय घडामोडींमध्ये श्रीकांत शिंदे यांची भूमिका महत्त्वाची राहिली होती. मात्र, मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. अंतिम निर्णय केंद्र सरकारकडून जाहीर झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- कोकणात ठाकरेंना मोठं बळ; ‘हा’ जुना नेता पुन्हा स्वगृही परतला
- शिधावाटप व्यवस्थेत होणार मोठे फेरबदल; जाणून घ्या…
- संजय पाटील विरुद्ध ठाकरे गट; आदित्य ठाकरेंनी दिलं खुलं चॅलेंज












