Share

कोकणात ठाकरेंना मोठं बळ; ‘हा’ जुना नेता पुन्हा स्वगृही परतला

सहा खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाला कोकणातून बळ मिळाले असून शिंदे गटातील बाळा पावसकर यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Published On: 

Uddhav Thackeray

मुंबई : शिवसेना ठाकरे गटातील (Thackeray Gat) सहा खासदारांनी शिंदे गटात (Shinde Gat) प्रवेश केल्यानंतर पक्षाला मोठा धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटासाठी कोकणातून दिलासादायक बातमी समोर आली आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेलेले ज्येष्ठ नेते बाळा पावसकर (Bala Pawaskar) यांनी पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्या उपस्थितीत पावसकर यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला.

सिंधुदुर्ग आणि कुडाळ परिसरातील स्थानिक राजकारणात बाळा पावसकर यांचा प्रभाव मानला जातो. कोकणात ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी त्यांच्या पुनरागमनाचा फायदा होणार असल्याची चर्चा आहे.

ठाकरे गटाची पुन्हा बांधणी करण्यासाठी पावसकर सक्रिय भूमिका बजावणार असल्याची माहिती आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात ते वैभव नाईक यांना साथ देणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, शिंदे गट कोकणात आपली पकड मजबूत करत असताना बाळा पावसकर यांच्या घरवापसीमुळे त्यांना राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही