Share

करीना कपूरने थेट जसप्रीत बुमराहला दिलं चॅलेंज! ‘त्या’ व्हायरल फोटोवर क्रिकेटरचं भन्नाट उत्तर

करीना कपूरने इन्स्टाग्रामवर क्रिकेट खेळतानाचा फोटो शेअर करत जसप्रीत बुमराहला चॅलेंज दिलं. यावर बुमराहने दिलेल्या मजेशीर उत्तराने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Published On: 

Kareena Kapoor Jasprit Bumrah viral Instagram story challenge on cricket

बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर (Kareena Kapoor) आणि भारतीय क्रिकेट संघाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांच्यात क्रिकेटच्या मैदानात थेट स्पर्धा झाली तर? वाचून थोडा धक्का बसला ना?

सध्या सोशल मीडियावर या दोन दिग्गजांमधल्या एका मजेशीर संवादाने चांगलीच हवा केली आहे. करीनाने इन्स्टाग्रामवर आपला लाडका लेक तैमूरसोबत क्रिकेट खेळतानाचा एक फोटो शेअर केला आणि त्यात चक्क बुमराहलाच थेट चॅलेंज दिलं.

Kareena Kapoor Jasprit Bumrah

झालं असं की, करीनाने इन्स्टा स्टोरीवर तैमूरला बॉलिंग करतानाचा फोटो टाकला होता. यावर तिने गमतीने लिहिलं, ‘माझ्या टॅलेंटला कमी लेखू नका, मी बुमराहलाही टक्कर देऊ शकते.’

तिच्या या मजेशीर आव्हानावर बुमराहही गप्प बसला नाही. त्यानेही लगेच रिप्लाय देत म्हटलं, ‘मला अजिबात त्यावर संशय नाही. तू खूपच प्रतिभावान आहेस.’ सोबतच त्याने एक हसणारा इमोजीही टाकला. या संवादाची चाहत्यांमध्ये तुफान चर्चा रंगली आहे.

दुसरीकडे, जसप्रीत बुमराहच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं तर तो आयपीएल २०२६ पासून टीमबाहेर आहे. काही मालिकांमधून त्याला विश्रांती देण्यात आली होती. पण आता बीसीसीआयने जाहीर केलेल्या इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेतून तो कमबॅक करणार आहे.

तैमूरच्या या क्रिकेट प्रेमामागे मोठा वारसा आहे. सैफचे वडील मन्सूर अली खान पतौडी हे भारताचे महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार होते. त्यामुळे आजोबांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत तैमूरही भविष्यात क्रिकेटच्या मैदानात उतरेल, अशी शक्यता नेटकरी वर्तवत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही