Share

Kolkata Warehouse Collapse: ५ जणांचा मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

कोलकात्यात निर्माणाधीन गोदामाचं छत कोसळून मोठी दुर्घटना घडली असून, 5 कामगारांचा मृत्यू झाला तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

Published On: 

Kolkata Warehouse Collapse

कोलकाता : दोन पैसे मिळावे म्हणून कामावर गेलेल्या कामगारांच्या जीवावर बेतली आहे. पश्चिम कोलकात्यातील (West Kolkata) तारातला परिसरात निर्माणाधीन गोदामाचं छत अचानक कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने आतापर्यंत चार कामगारांना सुरक्षित बाहेर काढले असून, पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अजूनही 45 हून अधिक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेस ब्रिजजवळ (Brace bridge) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गोदामाचं बांधकाम सुरू असतानाच अचानक छत कोसळलं आणि अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, छत कोसळण्याआधी कामगारांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केला आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्घटना अचानक घडली की अनेकांना स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली नाही.

दरम्यान, ही दुर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही