Share

सोसायटीतील जैनांच्या पांढऱ्या पट्टीविरोधात आवाज उठवला, यूट्यूबर प्रसाद वेदपाठकला धमक्यांचे फोन

विद्याविहारच्या सोसायटीत विनापरवानगी जैन धर्मगुरूंसाठी पांढरी पट्टी मारल्याने यूट्यूबर प्रसाद वेदपाठकने संताप व्यक्त केला आहे. धमक्यांनंतर त्याने पोलीस संरक्षणाची मागणी केली.

Published On: 

YouTuber Prasad Vedpathak speaking against the white line drawn in his society common area.

🕒 1 min read

मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घरात राहताना, इमारतीच्या सामायिक जागेत अचानक एखादा धार्मिक बदल तुमच्या परवानगीशिवाय झाला तर तुम्ही काय कराल? सध्या विद्याविहारमधील एका सोसायटीत असाच एक धक्कादायक प्रकार घडला असून, एका पांढऱ्या पट्टीवरून मोठा वाद उफाळून आला आहे.

प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक (Prasad Vedpathak) याने याप्रकरणी उघडपणे संताप व्यक्त केला आहे. सोसायटीच्या आवारात जैन धर्मगुरूंसाठी परस्पर एक पांढरी पट्टी मारण्यात आल्याचा त्याचा आरोप असून, या विरोधात आवाज उठवल्यामुळे त्याला आता थेट धमक्यांचे फोन येऊ लागले आहेत.

Prasad Vedpathak White Line Controversy

विद्याविहारच्या कैलास अव्हेन्यू सोसायटीत हा सगळा प्रकार घडला आहे. प्रसादने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, कमिटीमधील काही सदस्यांनी इतर रहिवाशांना कोणतीही पूर्वकल्पना न देता ही कायमस्वरूपी पांढरी पट्टी मारली आहे.

“माझ्या पणजोबांनी ही जागा घेतली, आजीने बिल्डिंग बांधली. तरीही सामायिक जागेत असे बदल करताना आम्हाला साधं विचारलंही जात नाही,” अशी खंत त्याने व्यक्त केली.

“जर आज इथे पांढरी पट्टी मारली, तर उद्या मी इथे बोकड किंवा कोंबड्या कापल्या तर चालेल का? किंवा एखाद्या मुस्लिम बांधवाने तिथे ‘अल्ला हू अकबर’ लिहिलं तर ते खपवून घेतलं जाईल का?” असा परखड सवाल त्याने उपस्थित केला आहे.

गेल्या २५ वर्षांपासून ही इमारत उभी आहे. घाटकोपरच्या पदपथांवर दिसणाऱ्या या पट्ट्या आता थेट आमच्या खाजगी मालमत्तेत आल्या आहेत, ही अत्यंत धोक्याची गोष्ट असल्याचे तो म्हणाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वादानंतर पोलिसांनी प्रसादच्या घरी जाऊन प्राथमिक चौकशी केली आहे. आपण जैन धर्मगुरूंचा आदर करतो, पण बहुमताच्या जोरावर कोणालाही गृहीत धरणे चुकीचे असल्याचे त्याचे म्हणणे आहे. वाढत्या धमक्यांमुळे त्याने आता पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली असून, याप्रकरणी पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही