Share

अरे वा ! सोन्या-चांदीच्या दरात झाली मोठी घसरण; खरेदी करण्यापूर्वी आजचे नवे दर नक्की तपासा!

आज ३ जून रोजी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली असून दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५६,३६० रुपये तर मुंबईत १,५६,२१० रुपये झाला आहे.

Published On: 

Gold Price Today drops in Indian market with new rates display

🕒 1 min read

लग्नसराईच्या दिवसांत सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असताना अचानक त्यात घसरण झाली, तर कोणाचा आनंद गगनात मावणार नाही? आज ३ जून रोजी सराफा बाजारातून एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली असून सोने (Gold Price Today) खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी जणू सोन्याची सकाळ उजाडली आहे.

जागतिक स्तरावरील भू-राजकीय तणावामुळे सध्या सोन्याच्या किमतीवर प्रचंड दबाव पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्याची चमक फिकी पडत असून आजही बाजारात भाव घसरल्याने ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. १ जून रोजी २४ कॅरेट सोने ८२० रुपयांनी स्वस्त झाले होते, तर आज पुन्हा किमतीत किंचित घट नोंदवली गेली आहे.

Gold Price Today

आजच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशाची राजधानी दिल्लीत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५६,३६० रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरू या प्रमुख शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५६,२१० रुपये इतका नोंदवला गेलाय. चेन्नईमध्ये मात्र सोने सर्वात महाग असून तिथे २४ कॅरेटसाठी १,५८,१७० रुपये मोजावे लागत आहेत.

सोन्यासोबतच चांदीच्या किमतीवरही अनिश्चिततेमुळे चांगलाच दबाव आलेला दिसतोय. सलग चार दिवसांच्या स्थिरतेनंतर आज दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यात चांदी प्रति किलो १०० रुपयांनी स्वस्त होऊन २,७९,९०० रुपयांवर आली आहे. मात्र, चेन्नईमध्ये चांदीचा भाव २,८९,९०० रुपये प्रति किलो असून तिथे चांदी खरेदी करणे इतर शहरांच्या तुलनेत अधिक महाग पडत आहे.

या दरातील घसरणीच्या दरम्यानच सरकारने चांदीच्या आयातीबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) आता ९९.९ टक्के शुद्धता असलेल्या चांदीच्या आयातीचे नियम अधिक कडक केले आहेत. त्यामुळेच आता विशिष्ट मार्गाने चांदी आणण्यासाठी सरकारची विशेष परवानगी घ्यावी लागणार असून यामुळे आगामी काळात बाजारातील समीकरणांमध्ये मोठी खळबळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!