Share

अंबादास दानवे यांचा मोठा गौप्यस्फोट; लाडकी बहीण योजनेतून आणखी ५०-६० लाख महिला अपात्र ठरणार

लाडकी बहीण योजनेतून आणखी ५० ते ६० लाख महिला अपात्र ठरतील, असा मोठा दावा करत अंबादास दानवे यांनी आदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Published On: 

Ladki Bahin Yojana Ambadas Danve demanding resignation of Aditi Tatkare

🕒 1 min read

मुंबई – लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये दरमहा घेणाऱ्या महिलांसाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे. ८० लाख महिला अपात्र ठरल्याचा धक्का ताजा असतानाच, आता आणखी ५० ते ६० लाख बहिणींची नावे या योजनेतून कापली जाणार असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

सरकारने केवळ जाचक अटी आणि ई-केवायसीच्या (e-KYC) नावाखाली महिलांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी थेट मंत्री आदिती तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Ambadas Danve on Ladki Bahin Yojana

मुदतीत केवायसी न केल्यामुळे आणि तांत्रिक त्रुटींमुळे राज्यातील तब्बल ८० लाख महिलांना नुकतंच योजनेतून वगळण्यात आलं आहे. या निर्णयामुळे विरोधकांनी आधीच सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. “सरकार या योजनेच्या नावाखाली केवळ गाजर दाखवत आहे. आता ८० लाख महिला गळल्या आहेत, पण लवकरच आणखी ५० ते ६० लाख महिला यातून कमी होतील,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

या सगळ्या प्रकारामुळे वर्षभरातच ही योजना केवळ नावापुरतीच उरेल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळेच आता या योजनेच्या पारदर्शकतेवर आणि अंमलबजावणीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दुसरीकडे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर वेगळीच भूमिका मांडली आहे. कुणालाही योजनेतून वगळण्याचा सरकारचा हेतू नाही. ज्या महिलांची केवायसी राहिली आहे, त्यांना पुन्हा नव्याने संधी उपलब्ध करून दिली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं.

पण तरीही दानवे यांच्या या दाव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे खरोखरच भविष्यात लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार की सरकार त्यांना न्याय देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!