Share

वैभव सूर्यवंशीला थेट बॉलिवूडची लॉटरी? दिग्दर्शक शेखर कपूरने केली पोस्ट, म्हणाले……

युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी लवकरच शेखर कपूर यांच्या ‘मासूम: द न्यू जनरेशन’ या सिनेमात दिसण्याची शक्यता आहे. त्यांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलंय.

Published On: 

Vaibhav Suryavanshi in Shekhar Kapur upcoming movie Masoom

🕒 1 min read

वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी आयपीएलमध्ये धुमाकूळ घालणारा क्रिकेटचा वंडर बॉय थेट मोठ्या पडद्यावर झळकणार? हा प्रश्न आता क्रिकेट आणि बॉलिवूड अशा दोन्ही वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

होय, सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेला आपला वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) फक्त क्रिकेटच नाही, तर आता चक्क एका सिनेमामुळे लाईमलाईटमध्ये आलाय. आता तुम्ही म्हणाल, या पोराचा आणि सिनेमाचा काय संबंध?

Vaibhav Suryavanshi movie 

तर बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक शेखर कपूर (Shekhar Kapur) यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी आपला आगामी ब्लॉकबस्टर सिनेमा ‘मासूम: द न्यू जनरेशन’साठी थेट वैभवलाच घेण्याची इच्छा बोलून दाखवलीय.

१९८३ मध्ये आलेल्या ‘मासूम’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः इतिहास रचला होता. नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी यांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या सिनेमाचा आता सीक्वल येतोय. ‘मासूम: द न्यू जनरेशन’ असं या नव्या प्रोजेक्टचं नाव असून, त्याला साक्षात ए. आर. रहमान संगीत देणार आहेत. त्यामुळे या सिनेमाची आधीच जोरदार चर्चा सुरू आहे.

याच सिनेमाच्या निमित्ताने शेखर कपूर यांनी ‘एक्स’ अकाऊंटवर वैभवचा फोटो शेअर करत एक मोठा गौप्यस्फोट केला. “जर वैभव इतका प्रसिद्ध आणि भारी क्रिकेटर नसता, तर मी नक्कीच त्याला ‘मासूम: द न्यू जनरेशन’मध्ये कास्ट केलं असतं,” असं भन्नाट कॅप्शन त्यांनी दिलंय. त्यांच्या या एका वाक्याने इंटरनेटवर अक्षरशः आग लावली आहे.

आयपीएल २०२६ मध्ये आपल्या बॅटने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या या ‘न्यू सेंसेशन’च्या प्रेमात चक्क शेखर कपूर पडल्याने फॅन्सच्या आनंदाला उधाण आलंय.

दुसरीकडे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नव्या सिनेमात मनोज बाजपेयी, नित्या मेनन आणि स्वतः नसीरुद्दीन शाह पुन्हा दिसणार आहेत. सिनेमाची कथा स्थलांतर आणि नात्यांमधील गुंतागुंतीवर आधारित असेल. आता शेखर कपूर यांच्या या पोस्टनंतर खरोखरच वैभव या सिनेमात कॅमिओ करणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!