अभिनेत्री दिपाली सय्यद यांना धमक्यांचे फोन, रुपाली चाकणकरांचा रोल केल्यास करिअर उद्ध्वस्त करण्याचा इशारा!

अशोक खरात प्रकरणावरील चित्रपटात रुपाली चाकणकरांची भूमिका साकारू नये म्हणून अभिनेत्री दिपाली सय्यद यांना धमक्यांचे फोन येत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

Published On: 

Dipali Sayyad Threatened over Rupali Chakankar role in upcoming Marathi movie

एखादा सिनेमा राजकीय नेत्यांची झोप उडवू शकतो का? नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित एका आगामी चित्रपटामुळे सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. या चित्रपटात काम करू नये म्हणून थेट अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांना धमक्यांचे फोन येत असल्याचा मोठा गौप्यस्फोट त्यांनी स्वतः केला आहे.

दिग्दर्शक स्वरूप बी सावंत यांचा ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात दिपाली सय्यद एका महिला नेत्याची, विशेषतः रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.

Dipali Sayyad Threatened

मात्र, हा रोल करू नकोस, अन्यथा तुझं राजकीय करिअर कायमचं उद्ध्वस्त करू, अशा धमक्या थेट काही महिला नेत्यांकडूनच येत असल्याची धक्कादायक माहिती दिपाली यांनी दिली आहे. मला कुणीही दाबू शकत नाही, कर नाही त्याला डर कशाचा? असं म्हणत दिपाली यांनी या दबावाला भीक न घालण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली या प्रकरणाची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे करणार आहेत. मला कोण फोन करतंय आणि कोण दबाव टाकतंय, याची सगळी पोलखोल मी त्यांच्यासमोर करणार असल्याचा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.

गेल्या चार महिन्यांपासून मी बिग बॉसच्या घरात होते, त्यामुळे बाहेर काय चाललंय याची मला काहीच कल्पना नव्हती, असं दिपाली यांनी स्पष्ट केलं. बाहेर आल्यानंतर कालच मला या चित्रपटाची स्क्रिप्ट मिळाली.

स्क्रिप्ट वाचल्यावरच या भयंकर प्रकरणाची व्याप्ती लक्षात आली. यात अनेक बडे लोक सहभागी असून, अशा प्रकरणांना आळा बसलाच पाहिजे, असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

अशोक खरात नावाचा भोंदूबाबा लोकांना काहीतरी प्यायला द्यायचा आणि भुरळ घालायचा, हे असं वागणारे गुरु कसे असू शकतात? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील पुसटशी रेषा लोकांना समजली पाहिजे. रुपाली चाकणकर यांची यात काही चूक आहे की नाही, हे पूर्ण स्क्रिप्ट वाचल्यावरच मी सांगेन, असं सावध उत्तर त्यांनी दिलं.

येत्या २ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, पुढच्या महिन्यापासून शूटिंग सुरू होईल. ‘आता सगळं उघड होणार…!’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन असल्यामुळे सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यावर अनेकांचे सभ्यतेचे मुखवटे गळून पडणार, यात आता कोणतीही शंका उरलेली नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही