Share

छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट, राष्ट्रवादीच्या बैठकीत स्वबळाचा नारा अन् धक्कादायक माहिती!

राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत छगन भुजबळांनी थेट स्वबळाचा नारा दिला आहे. मतदार यादी मोहिमेवरून त्यांनी आपली मतं कमी करण्याच्या डावाची धक्कादायक माहिती दिली.

Published On: 

BJP Tushar Bhosale criticized Chhagan Bhujbal about his statement himalaya saint

🕒 1 min read

मुंबई – महायुतीत सगळं काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला तरी आतून मात्र वेगळीच खिचडी शिजत आहे का? मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची एक अत्यंत गुप्त आणि वादळी बैठक पार पडली, ज्यातून आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मंगळवारी ‘देवगिरी’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार… या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. आपल्यावरील आरोपांवर पक्षातल्या कोणीच भक्कम साथ न दिल्याबद्दल तटकरेंनी तीव्र संताप व्यक्त केला, ज्यामुळे अचानक राजकारण तापलं.

NCP Political Crisis: भुजबळांचा स्वबळाचा नारा 

दुसरीकडे… याच बैठकीत भुजबळांनी सर्वांना धक्का देत २०२९ च्या निवडणुकांसाठी चक्क स्वबळाचा विचार मांडला आहे. आगामी काळात भाजप नेमकी काय भूमिका घेईल, याचा अजिबात भरवसा नाही. त्यामुळे आपण आतापासूनच सर्व २८८ मतदारसंघांची तयारी करायला हवी, असा रोखठोक सल्ला त्यांनी दिला.

सध्या सुरू असलेली विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) मोहीम हा एका विशिष्ट पक्षाच्या फायद्याचा खेळ असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या यंत्रणेचा वापर करून आपली हक्काची मतं पद्धतशीरपणे कमी करण्याचा मोठा डाव आखला जात आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास मोठा फटका बसेल, असा थेट हल्लाबोल भुजबळांनी केला.

त्यामुळेच पुढील दोन दिवसांत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) नेमून त्यांचे तातडीने प्रशिक्षण सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या सगळ्या तणावाच्या वातावरणात सुनेत्रा पवार यांनी मात्र सर्वांना सबुरीचा सल्ला देत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पक्षात मतभेद विसरून एकजूट टिकवणे सध्या सर्वात गरजेचे आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पक्षाची ताकद सर्वोच्च असून सर्वांनी एकाच सुरात बोलायला हवं, अशी समज सुनेत्रा पवारांनी दिली. अखेर या बैठकीत सुनेत्रावहिनी यांच्याच नेतृत्वाखाली पक्ष राज्यभरात अधिक मजबूत करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्या जो निर्णय घेतील, त्याला सर्वांचा ठाम पाठिंबा असेल, अशी ग्वाही देत नेत्यांनी बैठकीचा शेवट केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!