पेट्रोल-डिझेलचा सर्वसामान्यांना तिसरा झटका; आठवडाभरातच कडाडले भाव, तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?

आंतरराष्ट्रीय युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात नऊ दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले असून, मुंबईत पेट्रोल १०८.४५ रुपयांवर तर डिझेल ९५.०२ रुपयांवर पोहोचले आहे.

Published On: 

Windfall Tax Petrol Diesel export duty hiked in India

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधनाचा वापर जपून करण्याचं आवाहन केलं, तेव्हाच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. भविष्यात येणाऱ्या महागाईच्या संकटाची जी भीती होती, ती आता दुर्दैवाने खरी ठरताना दिसत आहे.

कारण अवघ्या नऊ दिवसांत पेट्रोलियम कंपन्यांनी सर्वसामान्यांना तब्बल तिसऱ्यांदा महागाईचा मोठा झटका दिलाय. शनिवार सकाळपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत.

Petrol Diesel Price Hike

आंतरराष्ट्रीय बाजारात इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे खनिज तेलाचे दर गगनाला भिडलेत. पाच राज्यांच्या निवडणुका संपताच तेल कंपन्यांनी आपला तोटा भरून काढण्यासाठी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे.

ताज्या दरवाढीनुसार, पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर ८७ पैसे तर डिझेलच्या दरात ९१ पैशांची मोठी वाढ करण्यात आली आहे. या नव्या वाढीमुळे मुंबईत आता पेट्रोल १०८.४५ रुपये आणि डिझेल ९५.०२ रुपयांवर पोहोचलं आहे. तर दिल्लीत सीएनजीचा दर प्रति किलो ८१.०९ रुपये झालाय.

या पेट्रोल डिझेल प्राईस हाईक (Petrol Diesel price hike) मुळे महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये तर पेट्रोलने ११० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. परभणीत पेट्रोल सर्वाधिक म्हणजे ११०.४५ रुपये प्रतिलीटरवर गेलं आहे.

एकीकडे खिसा रिकामा होत असताना दुसरीकडे राज्यातील बुलढाणा, जळगाव आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवू लागल्याने पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हीच परिस्थिती राहिली, तर येत्या काळात सर्वसामान्यांचे कंबरडे आणखी मोडणार हे स्पष्ट आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमधील नवे दर:

  • पुणे: पेट्रोल – १०८.७६, डिझेल – ९४.४०

  • नाशिक: पेट्रोल – १०९.७१, डिझेल – ९६.२६

  • नागपूर: पेट्रोल – १०८.९७, डिझेल – ९५.५८

  • रत्नागिरी: पेट्रोल – ११०.४४, डिझेल – ९७.०१

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही