Share

प्राजक्ता माळीचा ‘कान्स’मध्ये मराठमोळा लूक; रेड कार्पेटवर केलं असं काही की परदेशीही झाले थक्क!

प्राजक्ता माळीने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या मुख्य रेड कार्पेटवर नऊवारी साडीत दमदार एंट्री केली आहे. तिचा हा अस्सल मराठमोळा अंदाज सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरतोय.

Published On: 

Prajakta Mali Cannes Look: कान्समध्ये प्राजक्ताचा जलवा!

सातासमुद्रापार जेव्हा आपली मराठमोळी संस्कृती झळकते, तेव्हा साहजिकच प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून येतो. असाच एक भारावून टाकणारा प्रसंग आता जागतिक मंचावर पाहायला मिळालाय.

निमित्त होतं यंदाच्या प्रतिष्ठेच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलचं (Cannes Film Festival). या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात जिथे जगभरातील एकाहून एक अभिनेत्री वेस्टर्न आऊटफिटमध्ये मिरवत होत्या, तिथे चक्क आपल्या प्राजक्ता माळीने (Prajakta Mali Cannes Look) नऊवारी साडी नेसून सगळ्यांच्याच नजरा आपल्याकडे वळवून घेतल्या आहेत.

Prajakta Mali Cannes Look

प्राजक्ताने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या खास सोहळ्याचा एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये ती पारंपरिक नथ, साजश्रृंगार आणि अस्सल नऊवारी साडीत रेड कार्पेटवर रॅम्प वॉक करताना दिसत आहे. तिचा हा मराठमोळा ‘Prajakta Mali Cannes Look’ पाहून तिथले परदेशी फोटोग्राफर्सही अक्षरशः थक्क झाले. प्राजक्ताने ज्या ऐटीत आपला पदर फ्लॉन्ट करत जो ठसका दाखवलाय, त्याने सध्या सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिलीय.

या ऐतिहासिक क्षणी प्राजक्ताने एक खास पोस्ट लिहीत आपल्या भावना चाहत्यांसोबत शेअर केल्या. “कान्सच्या रेड कार्पेटवर अस्सल पारंपरिक नथ आणि नऊवार नेसून जगाला मराठी ठसका दाखवल्याचा आनंद अवर्णनीय आहे,” असं प्राजक्ताने म्हटलंय. याआधी जे मराठी कलाकार कान्सला गेले ते हिंदी चित्रपटांसाठी किंवा वेगळ्या रेड कार्पेटवर चालले, पण आपण थेट ‘मेन रेड कार्पेटवर’ मराठी भाषेच्या प्रसारार्थ चाललो, याचा प्रचंड आनंद असल्याचं तिने आवर्जून नमूद केलंय.

अलीकडेच आपल्या मायबोलीला मिळालेल्या ‘अभिजात दर्जा’च्या पार्श्वभूमीवर, कान्समध्ये भारत पॅव्हेलियन अंतर्गत ‘अभिजात मराठी’चं ग्लोबल लाँचिंग करण्यात आलं. याच अभिमानास्पद क्षणासाठी प्राजक्ता अधिकृत प्रतिनिधी म्हणून तिथे पोहोचली होती. तिच्यासोबतच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ आणि अंकिता वालावलकर यांनीही या फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install