Share

इशान किशनचा पलटवार आणि पंजाबची बेइज्जती; ‘त्या’ ५ शब्दांच्या पोस्टने उडवली मोठी खिल्ली!

पंजाब किंग्सच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत इशान किशनने अर्धशतक झळकावले. सामन्यानंतर इन्स्टाग्रामवर “Catch me if you can” लिहीत पंजाब संघाची खिल्ली उडवली.

Published On: 

IPL 2026 Ishan Kishan: पंजाबची उडवली खिल्ली!

🕒 1 min read

क्रिकेटच्या मैदानात कॅच सुटला की मॅच सुटते, असं म्हणतात. पण एकाच खेळाडूचे तीन-तीन कॅच सोडले तर काय होईल? आयपीएलच्या (IPL 2026) चालू हंगामात पंजाब किंग्सच्या क्षेत्ररक्षकांनी असाच काहीसा ‘पराक्रम’ केलाय.

सलग सहा विजयांनंतर सुसाट सुटलेल्या पंजाबला आता सलग तिसऱ्या पराभवाचा धक्का बसला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) टीमची ३३ धावांनी हार झाली. पण या पराभवापेक्षा सोशल मीडियावर सध्या जास्त चर्चा रंगलीये ती पंजाबच्या सुमार फिल्डिंगची.

IPL 2026 Ishan Kishan

SRH ने प्रथम फलंदाजी करताना तब्बल २३६ धावांचा डोंगर उभारला. यावेळी पंजाबच्या खेळाडूंनी अक्षरशः ‘कॅच प्रॅक्टिस’ सुरू असल्यासारखे सोपे झेल सोडले. याचाच फायदा घेत इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांनी पंजाबच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. विशेष म्हणजे, पंजाबने इशान किशनला (Ishan Kishan) एक-दोन नव्हे तर तब्बल तीनदा जीवदान दिलं! तो ९ धावांवर असताना कूपर कॉनॉलीने, १८ धावांवर लॉकी फर्ग्युसनने तर २० धावांवर प्रभसिमरन सिंगने यष्टीचीत करण्याची संधी हुकवली. या ढिसाळ कारभारामुळे इशानने अवघ्या ३२ चेंडूत ५५ धावा ठोकल्या.

या मॅचनंतर इशानने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत पंजाबच्या जखमेवर मीठ चोळलं. “Catch me if you can” (शक्य असेल तर मला पकडा) या अवघ्या पाच शब्दांच्या पोस्टने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवली आहे. IPL 2026 मधील ही सर्वात व्हायरल पोस्ट ठरत आहे.

फक्त इशानच नाही, तर खतरनाक फॉर्ममध्ये असलेल्या क्लासेनलाही १३ धावांवर शशांक सिंगने जीवदान दिलं. शशांकने या सीझनमध्ये आतापर्यंत तब्बल ५ कॅच सोडले आहेत. क्लासेनने या चुकीची मोठी शिक्षा देत ४३ चेंडूत ६९ धावा कुटल्या आणि पंजाबला पराभवाच्या खाईत ढकललं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही