Share

IND vs NZ Final: टीम इंडियाच्या महामुकाबल्यासाठी ICC चा मोठा निर्णय! ‘हे’ दोन दिग्गज सांभाळणार मैदान

अहमदाबादमध्ये रविवारी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या फायनलसाठी आयसीसीने अधिकृत पंचांची घोषणा केली असून रिचर्ड इलिंगवर्थ आणि ॲलेक्स व्हार्फ यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Published On: 

ind vs nz | रिचर्ड इलिंगवर्थ आणि ॲलेक्स व्हार्फ

IND vs NZ Final | रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर जेव्हा एक लाखाहून अधिक प्रेक्षक ‘इंडिया… इंडिया’ ओरडतील, तेव्हा मैदानात खेळाडूंपेक्षा जास्त दडपण कुणावर असेल? साहजिकच, पंचांवर! एका चुकीच्या निर्णयामुळे विश्वचषकाची ट्रॉफी हातातून निसटू शकते.

टी-२० विश्वचषक २०२६ च्या फायनलसाठी जगभरातील क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सूर्यकुमार यादवची टीम इंडिया आणि मिचेल सँटनरची न्यूझीलंड या महासंग्रामासाठी आमनेसामने येणार आहेत.

IND vs NZ T20 World Cup 2026 Final

या हाय-व्होल्टेज सामन्यात एकही चूक महागात पडू नये, यासाठी आयसीसीने (ICC) आज मॅच अधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा केली आहे. या महामुकाबल्यात इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ आणि ॲलेक्स व्हार्फ हे दोन अतिशय अनुभवी पंच मुख्य जबाबदारी सांभाळणार आहेत.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी संध्याकाळी ७ वाजता हा थरार सुरू होईल. इलिंगवर्थ आणि व्हार्फ यांना अशा मोठ्या आणि दबावाच्या सामन्यांचा प्रचंड अनुभव आहे.

विश्वचषकाच्या फायनलसारख्या सामन्यात पंचांचा एक निर्णय संपूर्ण सामन्याचं चित्र बदलू शकतो. त्यामुळे या दोन दिग्गजांची निवड करून आयसीसीने कोणतीही जोखीम न घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता रविवारी हे पंच १ लाख ३२ हजार प्रेक्षकांच्या दबावाखाली कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

तुमच्या प्रश्नाचे उत्तर आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास Web Search fallback वापरला जाऊ शकतो.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही