Share

Maharashtra Budget 2026: अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार… बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलेल्या बजेटमध्ये वाढवण येथे ‘चौथी मुंबई’ वसवण्याची आणि एमएमआरमध्ये १० लाख नवी घरे बांधण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.

Published On: 

Maharashtra Budget 2026: फडणवीसांच्या १० मोठ्या घोषणा!

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि अर्थकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (६ मार्च) विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2026) सादर करताना अशा काही घोषणा केल्या आहेत, ज्याने संपूर्ण राज्याचं चित्रच बदलणार आहे. विशेषतः मुंबई आणि आसपासच्या शहरात राहणाऱ्या लोकांसाठी हा बजेट मोठा गेमचेंजर ठरणार आहे.

सर्वात मोठी आणि धक्कादायक घोषणा म्हणजे राज्यात आता ‘चौथी मुंबई’ वसवली जाणार आहे! मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की, वाढवण येथे चौथी मुंबई तर उरण परिसरात ‘तिसरी मुंबई’ विकसित केली जाईल. सोबतच एमएमआर (MMR) क्षेत्रात तब्बल १० लाख नवी घरे बांधण्याचं मोठं लक्ष्य सरकारने ठेवलंय. त्यामुळे सर्वसामान्यांचं मुंबईत हक्काचं घर घेण्याचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे.

Maharashtra Budget 2026

या बजेट सत्रात एक अतिशय भावनिक क्षणही पाहायला मिळाला. फडणवीसांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या कार्याची आठवण काढत, त्यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक आणि गतिमान नागरी सेवा पुरस्कार जाहीर केला. अजितदादांनी तब्बल ११ वेळा अर्थसंकल्प मांडला होता, त्यामुळे आज सभागृहात त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवत होती.

पायाभूत सुविधांसाठी सरकारने खऱ्या अर्थाने तिजोरी उघडली आहे. राज्यात १ हजार २०० किलोमीटरचे नवे मेट्रो मार्ग आणि ६ हजार किलोमीटरचे एक्सप्रेस वे विकसित केले जाणार आहेत. लातूर, बारामती आणि अमरावती विमानतळांवर आता रात्रीच्या उड्डाणांची (Night Landing) सुविधा सुरू होणार आहे. तर गडचिरोलीत तब्बल २ लाख कोटींची गुंतवणूक करून नवं स्टील हब उभारण्यात येणार असून, यातून ७० हजार रोजगार निर्माण होतील.

शेतकऱ्यांसाठीही फडणवीसांनी मोठी तरतूद केलीय. गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत आता शेतमजुरांचाही समावेश करण्यात आला आहे. प्रधानमंत्री सौर योजनेअंतर्गत रुफ टॉप सोलर आणि महिला गोपालकांसाठी विशेष योजना जाहीर झाल्या आहेत. एकंदरीतच पायाभूत सुविधा, रोजगार आणि शेतीवर फोकस करत २०२६ चा हा अर्थसंकल्प ‘विकसित महाराष्ट्रा’च्या दिशेने पडलेलं महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही