Ind vs Pak: टॉसच्या वेळी सूर्यकुमारचा ‘तो’ रुद्रावतार; सूर्यकुमार यादवने नेमकं काय केलं?

कोलंबोमध्ये टॉसच्या वेळी सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन टाळत भारताची कडक भूमिका स्पष्ट केली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Published On: 

Ind vs Pak Toss: सूर्याने हँडशेक नाकारला; पाकिस्तानचा अपमान?

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर जे घडलं, ते पाहून पाकिस्तानची (Pakistan) बोलती बंद झालीये. भारत-पाकिस्तान (Ind vs Pak) सामना म्हटलं की, मैदानात ठिणगी पडणार हे नक्कीच असतं. पण आज टॉसच्या वेळीच भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) जे केलं, त्याची चर्चा आता जगभरात सुरू झालीये.

टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या (T20 World Cup 2026) या महामुकाबल्यात भारताने आपली ‘नो हँडशेक पॉलिसी’ (No Handshake Policy) पुन्हा एकदा जगाला दाखवून दिली. नाणीफेकीच्या वेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान आगाशी (Salman Agha) साधं हस्तांदोलनही केलं नाही.

Ind vs Pak Toss

थेट आपल्या देहबोलीतून त्याने “आम्ही इथे मैत्री करायला नाही, तर हिशोब चुकता करायला आलोय,” असा कडक संदेश दिला. विशेष म्हणजे, आयसीसीच्या स्पर्धेत असं पहिल्यांदाच घडलंय. आशिया कप २०२५ मध्ये सुरू झालेला हा सिलसिला आजही कायम आहे.

कालच्या पत्रकार परिषदेतच सूर्याने याचे संकेत दिले होते. “यासाठी उद्यापर्यंत वाट पाहा,” असं तो म्हणाला होता आणि आज त्याने ते करून दाखवलं. दरम्यान, पाकिस्तानने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली खरी, पण सूर्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास जराही ढळला नाही. “आम्हाला आधी बॅटिंग करायला काहीच हरकत नाही, उलट आम्हाला हेच हवं होतं. आम्ही धावसंख्या वाचवण्यात (Defend) माहीर आहोत,” असं सांगत त्याने पाकिस्तानवर उलट मानसिक दडपण टाकलंय.

संघामध्येही दोन मोठे बदल झालेत. दुखापतीतून सावरलेला अभिषेक शर्मा पुन्हा टीममध्ये आलाय. तर खेळपट्टी फिरकीला मदत करणारी असल्याने अर्शदीपच्या जागी ‘चायनामन’ कुलदीप यादवला संधी दिलीये. आता भारताचा हा ‘अटॅकिंग मोड’ पाकिस्तानला किती महागात पडतो, हे पाहणं थरारक ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही