Share

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या तिजोरीत येणार तब्बल १ लाख कोटी! फडणवीसांनी फोडलं आकडेवारीचं ‘सीक्रेट’

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर निधीचा वर्षाव झाला आहे. राज्याला कराच्या हिश्श्यापोटी आणि विविध प्रकल्पांसाठी मिळून १ लाख कोटींहून अधिक रक्कम मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.

Published On: 

Budget 2026: महाराष्ट्राला १ लाख कोटींचे गिफ्ट; फडणवीसांनी दिली आकडेवारी

“दिल्लीत अर्थसंकल्प सादर झाला, पण महाराष्ट्राच्या ताटात नेमकं काय पडलं?” सकाळपासून सर्वसामान्यांपासून विरोधकांपर्यंत हाच प्रश्न विचारला जात होता. आता या सस्पेन्सवरून पडदा उठला आहे. आकडा ऐकून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण केंद्राने यावेळी महाराष्ट्रासाठी तिजोरीचं दार सताड उघडलं आहे!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे (Union Budget 2026) विश्लेषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आनंदाची बातमी दिली. केंद्रीय करातून महाराष्ट्राला तब्बल ९८,३०६ कोटी रुपये मिळणार आहेत. पण, पिक्चर अभी बाकी है! याशिवाय विविध प्रकल्पांसाठी १२,३५५ कोटींची वेगळी तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच, एकूण विचार करता राज्याला केंद्राकडून सुमारे १ लाख १० हजार कोटी रुपये मिळणार आहेत.

Devendra Fadnavis On Budget 2026

शहरी विकासावर या बजेटमध्ये विशेष फोकस आहे. फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई (MMR), पुणे आणि नागपूरचा ‘ग्रोथ हब’ म्हणून विकास केला जाईल, ज्यासाठी ५ वर्षांत प्रत्येकी ५००० कोटी मिळतील.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन : ६१०३ कोटी

मुंबई मेट्रो : १७०२ कोटी

पुणे मेट्रो : ५१७.७४ कोटी

समृद्धी महामार्ग (ITS) : ६८०.७९ कोटी

केवळ शहरेच नाही, तर ग्रामीण महाराष्ट्रासाठीही हात सैल सोडण्यात आला आहे. शेती आणि ग्रामीण परिवर्तनासाठी ६४६ कोटी, तर उपसा सिंचन योजना सोलराइज करण्यासाठी २०७ कोटी मंजूर झालेत. महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे आणि ‘लखपती दीदीं’साठी स्वतंत्र मॉल्स उभारले जाणार आहेत. “हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला ५ ट्रिलियन इकॉनॉमीकडे नेणारा आहे,” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

थोडक्यात सांगायचं तर, बुलेट ट्रेनपासून ते थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत… या बजेटने महाराष्ट्राच्या विकासाला ‘हायस्पीड’ गती दिली आहे, हे नक्की!

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही