Share

Border 2 : 27 वर्षांनंतर सनी पाजींचा ‘धुरळा’! पहिल्याच दिवशी ‘धुरंधर’ला आपटलं

सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’ ने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. पहिल्या दिवशी 30 कोटींची कमाई करत ‘धुरंधर’चा रेकॉर्ड मोडला आहे.

Published On: 

Border 2 Box Office : 27 वर्षांनंतर सनी पाजींचा ‘धुरळा’! पहिल्याच दिवशी ‘धुरंधर’ला आपटलं

२७ वर्षांपूर्वीचा तो दिवस आठवतोय? जेव्हा ‘संदेशे आते है’ ऐकून अख्खा देश रडला होता. आता इतिहास पुन्हा घडलाय. सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’ने बॉक्स ऑफिसवर नुसता धुरळा उडवला आहे. 2026 ची सुरुवातच सनी पाजींच्या डरकाळीने झाली असून, 2025 च्या ब्लॉकबस्टर ‘धुरंधर’ला पहिल्याच दिवशी कात्रजचा घाट दाखवला आहे.

Border 2 Box Office Collection

‘बॉर्डर 2’ बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले. रिलीजच्या एक दिवस आधीच 4 लाख तिकीटं विकली गेली होती, तेव्हाच अंदाज आला होता की काहीतरी मोठं घडणार. चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 30 कोटींचा गल्ला जमवला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, हा आकडा 35 ते 40 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, गेल्या वर्षी गाजलेल्या ‘धुरंधर’ने पहिल्या दिवशी 28 कोटी कमावले होते. म्हणजेच काय, तर सनी देओलने पहिल्याच बॉलवर सिक्स मारत ‘धुरंधर’चा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

नाईट शोला तुफान गर्दी होत असून अनेक ठिकाणी ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकले आहेत. यावेळी सनी पाजींसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी सुद्धा सीमेवर लढताना दिसत आहेत. 1997 मध्ये लोंगेवाला लढाई गाजली होती, तर आता 1971 च्या ‘ऑपरेशन चंगेज खान’चा थरार प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवतोय.

चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता, पहिल्या वीकेंडलाच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करेल, अशी जोरदार चर्चा आहे. ‘धुरंधर’ने नंतर वेग पकडला होता, पण ‘बॉर्डर 2’ने सुरुवातीलाच गियर टाकला आहे. प्रेक्षकांचा हा भावनिक ओलावा पाहता, हा सिनेमा नवीन इतिहास रचणार, यात शंका नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install