सोनं ४००० रुपयांनी कोसळलं! चांदीत ऐतिहासिक घसरण; खरेदीची हीच का वेळ?

सोन्याचे दर ४००० रुपयांनी तर चांदीचे दर तब्बल २०,००० रुपयांनी कोसळले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे बाजारात मोठी घसरण झाली आहे.

Published On: 

Gold Silver Rate Today : बापरे! चांदी 20 हजारांनी स्वस्त, सोनंही पडलं; पाहा नवे दर

तुम्ही जर सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी एखाद्या लॉटरीपेक्षा कमी नाही. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे भाव (Gold Silver Rate) गगनाला भिडले होते, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत होती. मात्र, आता चित्र पालटलं आहे. गुरुवारी सराफा बाजारात मोठी उलथापालथ झाली असून, चांदीचे दर तब्बल २०,००० रुपयांनी गडगडले आहेत. तर दुसरीकडे सोन्याच्या भावातही मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Gold Silver Rate Today

गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. ५ मार्चच्या एक्सपायरीच्या चांदीच्या वायद्याचे दर बुधवारी ३,२५,६०२ रुपयांवर होते. मात्र, आज त्यात १९,८४९ रुपयांची प्रचंड घसरण झाली आणि भाव ३,०५,७५३ रुपयांवर आले. दुसरीकडे, सोन्यानेही मान टाकली आहे. सोन्याचे दर ४,०८५ रुपयांनी कमी होऊन १,४८,७७७ रुपयांवर स्थिरावले आहेत.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अचानक एवढी मोठी घसरण का झाली? तर याचं उत्तर अमेरिकेत दडलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ग्रीनलँड आणि युरोप संदर्भात आपल्या धोरणात मोठे बदल केले आहेत. त्यांच्या या निर्णयाचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर झाला असून, त्यामुळेच सोन्या-चांदीचे भाव जमिनीवर आले आहेत, अशी चर्चा सध्या मार्केटमध्ये आहे.

सराफा बाजारातही या घसरणीचे पडसाद उमटले आहेत. जीएसटीसह (GST) एक तोळे (२४ कॅरेट) सोन्याचा दर आता १,५६,०४३ रुपये इतका झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर २४९९ रुपयांनी कमी होऊन, जीएसटीसह १,४२,९३६ रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा विचार केला तर, सराफा बाजारात चांदी १५,५१३ रुपयांनी स्वस्त झाली असून, जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव ३,१२,६९१ रुपये इतका आहे. लग्नसराईच्या तोंडावर हा दिलासा ग्राहकांसाठी खूप महत्त्वाचा मानला जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही