MPSC Update: एमपीएससीचा मोठा निर्णय! अचानक जागांमध्ये मोठी वाढ; आता ‘इतक्या’ पदांसाठी होणार मेगाभरती

एमपीएससीने २०२५ च्या परीक्षेसाठी जागांमध्ये मोठी वाढ केली असून आता ६०५ पदांसाठी भरती होणार आहे. वनसेवेसाठी तब्बल १४४ जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Published On: 

MPSC Vacancy 2025 | MPSC 2025

पुणे – सरकारी नोकरीसाठी (Government Job) वर्षानुवर्षे झटणाऱ्या आणि लायब्ररीत दिवसरात्र एक करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खरोखरच ‘गुड न्यूज’ घेऊन आलाय. जागा कमी असल्याने विद्यार्थ्यांमध्ये जी नाराजी आणि अस्वस्थता होती, ती आयोगाने एका झटक्यात दूर केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC 2025) घेतलेल्या एका निर्णयामुळे आता स्पर्धा परीक्षेच्या विश्वात आनंदाची लाट पसरली आहे.

महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त सेवा पूर्वपरीक्षा २०२५ साठी आयोगाने सुधारित मागणीपत्र स्वीकारत जागांमध्ये बंपर वाढ केली आहे. त्यामुळे आता एकूण ६०५ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही मोठी संधी चालून आल्याने, ज्यांनी अजून अर्ज केला नसेल, त्यांनी तात्काळ हालचाली कराव्यात, असं आवाहन करण्यात येतंय.

MPSC 2025 Vacancy Update

सर्वात आनंदाची बातमी वनसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पहिल्या जाहिरातीत वनविभागाच्या जागा नसल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता, अगदी निवेदनंही दिली होती. याची दखल घेत आता वन क्षेत्रपाल (Forest Range Officer) पदाच्या तब्बल १४४ जागा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

आयोगाने जाहीर केलेल्या शुद्धीपत्रकानुसार, सहायक राज्य कर आयुक्त पदासाठी तब्बल ७९ जागा उपलब्ध झाल्या आहेत. यासोबतच खाकी वर्दीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी पोलीस उपअधीक्षक (DySP) आणि सहायक पोलीस आयुक्त संवर्गाच्या ४ जागा, तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) संवर्गाच्या २१ जागा वाढवण्यात आल्या आहेत.

मंत्रालयीन कक्ष अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि कौशल्य विकास विभागातही जागा वाढल्याने आता संधीचे दरवाजे उघडले आहेत. “आता नाही तर कधीच नाही”, असं म्हणत विद्यार्थ्यांनी आता अभ्यासाचा गिअर टाकला आहे. शासनाने नव्याने मागणीपत्र दिल्याने हे शक्य झाल्याचं बोललं जातंय.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही