Zilla Parishad Election: गावोगावी राजकारण तापणार! आजपासून १२ जिल्ह्यांत रणधुमाळी, पाहा वेळापत्रक

राज्यात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात, ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

Published On: 

Zilla Parishad Election

Zilla Parishad Election: शहरातील निवडणुकांचा ‘हल्लाबोल’ शांत होतोय ना तोच आता ग्रामीण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. गावखेड्यातील राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांचा कार्यक्रम जाहीर केला असून, आजपासून (१६ जानेवारी) या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

ग्रामीण भागात Zilla Parishad Election ची रणधुमाळी

महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष या निवडणुकांकडे लागले होते. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून, ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल. त्यामुळे आता पुढचे काही दिवस ग्रामीण भागात प्रचाराचा ‘धुरळा’ उडणार हे नक्की.

नेमकं वेळापत्रक कसं आहे?

इच्छूक उमेदवारांना आजपासून म्हणजेच १६ जानेवारीपासून अर्ज भरता येणार आहेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २१ जानेवारी आहे. अर्जांची छाननी २२ जानेवारीला होईल, तर २७ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी उमेदवारांना चिन्हांचे वाटप होईल. प्रत्यक्ष मतदान ५ फेब्रुवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.

कोणत्या जिल्ह्यांत निवडणूक?

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांसह कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी व धाराशिव या १२ जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक होत आहे.

दुसरीकडे, Zilla Parishad Election साठी राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे मुदतवाढ मागितली होती. न्यायालयाने आयोगाला १५ दिवसांचा वेळ वाढवून दिला असून, १५ फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे बंधन आयोगावर आहे. ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक आहे, तिथे दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही