🕒 1 min read
पुणे – प्रशासन किती भोंगळ असू शकतं, याचा एक धक्कादायक नमुना आता समोर आला आहे. एरवी निवडणुकीच्या वेळी सर्वसामान्यांची नावं मतदार यादीतून गायब झाल्याच्या तक्रारी आपण ऐकतो, पण आता चक्क राज्याच्या एका माजी बड्या सनदी अधिकाऱ्याचे नावच यादीतून उडवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. खुद्द निवृत्त प्रधान सचिव Mahesh Zagade यांनीच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला असून, त्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून टीका केली आहे.
मतदार यादीतून नाव गायब झाल्यावर Mahesh Zagade यांचा हल्लाबोल
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Central EC) मतदार यादीत महेश झगडे यांचे नाव मतदार यादीत व्यवस्थित आहे. मात्र, जेव्हा राज्य निवडणूक आयोगाची यादी पाहिली, तेव्हा त्यातून त्यांचे नाव चक्क वगळण्यात आले होते. एकीकडे प्रशासन मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जाहिराती करते, आणि दुसरीकडे जबाबदार नागरिकांची नावं अशी अचानक गायब होतात, यावर झगडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या अनागोंदी कारभारावर बोलताना महेश झगडे यांनी अतिशय कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, “माझे नाव केंद्रीय यादीत आहे, पण राज्य निवडणूक आयुक्तांनी ते उडवले. राज्य निवडणूक आयुक्तांनी लोकशाहीचा बट्ट्याबोळ केलाय!!” एका माजी सनदी अधिकाऱ्यानेच थेट आयोगावर असा गंभीर आरोप केल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
जर एका माजी FDA कमिशनर आणि प्रधान सचिवांची ही अवस्था असेल, तर सामान्य मतदारांचे काय होत असेल? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून (SEC) अद्याप यावर कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही, मात्र झगडे यांच्या या गौप्यस्फोटामुळे मतदार यादीतील घोळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
माझे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत नाव आहे , पण राज्य निवडणूक आयुक्तांनी ते उडविले. राज्य निवडणूक आयुक्तांनी लोकशाहीचा बट्ट्याबोळ केलाय!!
— Mahesh Zagade, IASx (@MaheshZagade07) January 15, 2026
📌 महत्वाच्या बातम्या
- Aamir Khan: ‘हिंदीत का बोलू? हा महाराष्ट्र आहे…’ आमिरच्या एका वाक्याने जिंकली मुंबईकरांची मनं!
- ‘इंटरनॅशनल’ स्कूलबाहेर कचऱ्याचा ढीग पाहून शशांक केतकरचा तिळपापड; म्हणाला, ‘उद्या कोणीही निवडून येऊ दे…’
- IND vs NZ: तिसरा सामना रद्द होणार? इंदूरमध्ये पावसाची शक्यता किती? हवामान खात्याचा मोठा अपडेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












