Share

नाशिकमध्ये खाकीला काळिमा; २ लाखांच्या लाचेसाठी दोन फौजदार पसार, नेमकं काय घडलं?

नाशिकमध्ये अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी २ लाखांची लाच मागणाऱ्या दोन फौजदारांवर गुन्हा दाखल झाला असून लाचखोरी उघड होताच ते पसार झाले आहेत.

Published On: 

Nashik Police Bribe Case

नाशिक– कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा सर्वसामान्यांनी कोणाकडे पाहायचं? असाच एक संतापजनक प्रकार नाशिकमधून समोर आलाय. चक्क अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी खाकी वर्दीतील (Nashik Police ) दोन अधिकाऱ्यांनीच ‘दोन लाख रुपयांची’ मागणी केली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (ACB Nashik) ससेमिरा लागताच हे दोन्ही बहाद्दर पोलीस ठाण्यातून पसार झाले. या घटनेमुळे नाशिकच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

Nashik Police Bribe Case

नेमकं प्रकरण काय?

मुंबईनाका पोलीस ठाण्यातील (Mumbai Naka Police Station) दोन उपनिरीक्षकांवर (PSI) लाचखोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. दत्तात्रय गोडे आणि अतुल क्षीरसागर अशी या संशयित अधिकाऱ्यांची नावे आहेत. एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी त्यांनी तक्रारदार कंत्राटदाराकडे तब्बल दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. पण कंत्राटदाराने लाच देण्यास नकार देत थेट एसीबीकडे धाव घेतली आणि या दोघांचं पितळ उघडं पडलं.

या भ्रष्टाचारासाठी त्यांनी थेट शासकीय विश्रामगृहाच्या (Govt Rest House) उपहारगृहाचा वापर केला. उपहारगृह चालक रमेश आहिरे आणि त्याचा मुलगा कल्पेश आहिरे यांनी यात मध्यस्थी केली. एसीबीने शनिवारी रात्री सापळा रचला आणि कल्पेशला दोन लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. चौकशीत त्याने हे पैसे ‘साहेब लोकांसाठी’च घेतल्याची कबुली दिली.

फौजदार नॉट रिचेबल: लाच स्वीकारल्याचं कळताच आणि गुन्हा दाखल होताच दत्तात्रय गोडे (PSI Dattatray Gode) आणि अतुल क्षीरसागर हे दोन्ही फौजदार शहरातून पसार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू असून लवकरच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अतुल क्षीरसागर हाच ‘मास्टरमाइंड’ असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. ज्या पोलीस ठाण्यात ते रुबाब करायचे, तिथेच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने नाशिककरांमधून संताप व्यक्त होत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही