🕒 1 min read
अकोला – पुण्याचं राजकारण सध्या इतक्या वैयक्तिक पातळीवर उतरलंय की विचारता सोय नाही! महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत आणि इकडे भाजप-राष्ट्रवादीत शाब्दिक युद्धाचा भडका उडालाय. “पुण्याचे आका कोण?” या एका प्रश्नावरून सुरू झालेला हा वाद आता थेट वाघ, सिंह आणि ‘लांडग्यांपर्यंत’ येऊन पोहोचलाय.
झालं असं की, पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. अजित पवार हेच महाराष्ट्राचे ‘आका’ आहेत, असा घणाघात त्यांनी केला. इतकंच नाही तर, “स्वतःचा भ्रष्टाचार लपवायला आणि लेकाचे पराक्रम झाकायला तुम्ही सत्तेत आलात,” असा गंभीर आरोपही लांडगेंनी केला. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
Amol Mitkari vs Mahesh Landge
यावर, राष्ट्रवादीची ‘तोफ’ समजले जाणारे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी लांडगेंचा समाचार घेतला, आणि तो ही अगदी आपल्या खास शैलीत! मिटकरी यांनी महेश लांडगे यांच्या आडनावाचाच आधार घेत अत्यंत खोचक टोला लगावला. ते म्हणाले, “राष्ट्रवादीचा वारसा शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) या सिंह आणि वाघाचा आहे. त्यामुळे आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही.”
मिटकरी इथेच थांबले नाहीत. त्यांनी संत तुकारामांच्या एका अभंगाचा दाखला देत, “भुंकणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका” असा सूचक सल्लाही कार्यकर्त्यांना दिला. दुसरीकडे, “मी कोण आहे हे जनता ठरवेल, १५ तारखेपर्यंत कळ काढा,” असं म्हणत अजितदादांनी हा विषय एका वाक्यात संपवला.
दरम्यान, पुण्यात मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), महेश लांडगे विरुद्ध अजित पवार यांच्यातही कलगीतुरा रंगलाय. विकासाच्या मुद्द्यावरून मोहोळांनी अजितदादांना पुराव्यांचं आव्हान दिलंय. एकंदरीत काय, तर पुण्यात थंडी असली तरी राजकीय वातावरण मात्र या आरोप-प्रत्यारोपांनी चांगलंच तापलंय!
📌 महत्वाच्या बातम्या
- T20 वर्ल्डकपपूर्वी भारताला मोठा धक्का! ‘मॅच विनर’ खेळाडू थेट हॉस्पिटलमध्ये; आता ‘या’ स्टारची लागणार लॉटरी?
- “वाटलं किशमिश येईल, पण…” मुलगी न झाल्याचं दु:ख? भारतीने भर सेटवर पती हर्षची ‘पोलखोल’ केली!
- शाहीन आफ्रिदीची मोठी वल्गना; भारताला दिला थेट इशारा, म्हणाला – “आम्ही मैदानातच बघून घेऊ!”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












